घरताज्या घडामोडीकरोना अपडेट - करोना मुंबईत शिरला; मुंबईत दोन रुग्ण पॉझिटिव्ह!

करोना अपडेट – करोना मुंबईत शिरला; मुंबईत दोन रुग्ण पॉझिटिव्ह!

Subscribe

मुंबईत करोनाचे दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू होते. मुंबईत सुरू असलेल्या सहा रुग्णांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं कस्तुरबा हॉस्पिटलच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेने स्पष्ट केलं आहे. दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील दोन प्रवासी दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू असून या रुग्णांसोबत मुंबईतील दोन सहप्रवासी देखील करोना बाधित असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

११ मार्च पर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १ हजार १९५ विमानांमधील १ लाक ३८, ९६८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सुचनेनुसार, सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या ३ विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय, बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६३५ प्रवासी आले आहेत.

- Advertisement -

१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर, १० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १८ जण पुण्यात तर १५ जण मुंबईत दाखल आहेत. शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वायसीएम हॉस्पिटलमध्ये पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण दाखल आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६३५ प्रवाशांपैकी ३७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ,बुलढाणा नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यातूनही बाधित भागांतून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

मुंबईकरांनो घाबरू नका, पालिका सज्ज 

मुंबईकरांनो घाबरू नका. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करा. कस्तुरबा रुग्णालयात सर्व यंत्रणा सज्ज आहे. करोनाचे दोन्ही रुग्ण पुणे आणि सौदी येथे जाऊन आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. इतर लोकांना याची बाधा होऊ नये म्हणून पालिका सज्ज आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून कब्बडीच्या महापौर चषक स्पर्धा रद्द केल्या आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील दोन्ही रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -
करोना व्हायरसचे मुंबईत दोन रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण ती संख्या सातवर गेली आहे. वीणा ट्रॅव्हल्स माध्यमातून गेलेले हे पाचही रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या ट्रॅव्हल्सने प्रवास केलेले सर्व प्रवासी ट्रेस झाले आहेत. राज्यात कुठल्याही प्रकारचा मोठा समारंभ होणार नाही असा निर्णय कॅबिनेट मध्ये झाला आहे. मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. सध्या तरी शाळा बंद करण्यासाठी कोणताही निर्णय झालेला नाही. उलट शाळा बंद केल्या तर अधिक पॅनिक अवस्था होईल. त्यामुळे सध्यातरी शाळा कॉलेज बंद करण्यासारखी अवस्था नाही असं डॉक्टरांनी सांगितले. आयपीएल संदर्भामध्ये दोन भूमिका आहेत. एकतर सामने होतील पण गॅलरी पासेस दिले जाणार नाहीत. घरी बसून थेट प्रक्षेपण पाहता येईल किंवा आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात यावा अशा दोन भूमिका आहे त्यावरती अद्याप निर्णय झालेला नाही.राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात करोनाग्रस्त रूग्णांच्या कुटुंबाला टाकले वाळीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -