घरमुंबईकोपरी पुल बांधकामासाठी वाहतूक 'या' तारखांना बंद

कोपरी पुल बांधकामासाठी वाहतूक ‘या’ तारखांना बंद

Subscribe

१६ जानेवारीला पुलाचे गर्डर लॉन्चिंगचे काम हाती

ठाण्यापासून मुंबई शहराला जोडणाऱ्या नवीन कोपरी पुलाच्या बांधकामासाठी या आठवड्यातील शनिवार, रविवारी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रात्री प्रत्येकी सात तासांसाठी रस्ते वाहतुक बंद असणार आहे. दरम्यान या कालावधीत सर्व वाहने वेगवेगळ्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यासंदर्भात ठाणे वाहतूक विभागाने परिपत्रक काढत वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करत प्रवास करावा असे आवाहन केले आहे. या नव्या पुलामुळे भविष्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सध्या जुन्या कोपर पुल पाडून त्याजागी नव्या कोपरी पूलाचे बांधकाम एमएमआरडीएच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. दोन टप्प्यात हे काम केले जाणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या शेजारी दोन्ही बाजूला मार्गिका उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही दिशेकडील मार्गिका जोडणीसाठी रेल्वे ट्रॅकवर गर्डर उभारावे लागणार आहे. पालघर येथे सुरू असलेले या गर्डरचे काम पूर्ण झाले असून ते बसविण्याचे काम 16 जानेवारीपासून सुरू होत आहे. हे काम 16 जानेवारी रोजी रात्री 11 ते 17 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजेपर्यंत तसेच, 17 जानेवारी रोजी रात्री 11 ते 18 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कालावधीत मुंबईहून ठाणे आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने ये- जा करणा-या सर्व हलक्या, जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना आपल्या इच्छितस्थळी जाता यावे, यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

 

- Advertisement -

अवजड वाहनांकरिता कोणता मार्ग

नाशिक मुंबई महार्गाने ठाणे शहरांतून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणा-या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गँमन चौक – पारसिक रेती बंदर – मुंब्रा बायपास – शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन म्हापेमार्गे रबाळे – ऐरोली ब्रिज मार्गे पूर्व द्रुतगती मार्गने इच्छित स्थळी जातील. घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरांतून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणा-या जड- अवजड वाहनांना माजीवाडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास व गोल्डन क्राँस माजीवाडा ब्रिज खाली प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने तत्वज्ञान सिग्नलपुढे माजीवाडा ब्रिजवरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गँमन चौक – पारसिक रेती बंदर – मुंब्रा बायपास – शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन म्हापेमार्गे रबाळे – ऐरोली ब्रिजमार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.

हलक्या वाहनांकरिता कोणता मार्ग

नाशिक व घोडबंदर रोडने तसेच, ठाणे शहरांतून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणा-या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना नौपाडा सर्व्हिस रोड महालक्ष्मी मंदिरासमोरून कोपरी ब्रिजकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. नाशिकमार्गे मुंबईकडे जाणारी हलकी वाहने साकेत कट डावीकडे वळण घेऊन महालक्ष्मी मंदिर – साकेत रोड – क्रिकनाका डावीकडे वळण घेऊन शिवाजी चौक कळवा- विटावा -ऐरोलीहून ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने इच्छित स्थळी जातील. ठाणे शहरातून मुंबईक़डे जाणारी हलकी वाहने ही जीपी आॅफीस – ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोड- आरटीओ कार्यालयासमोरून – क्रिकनाका – कळवा ब्रिज – शिवाजी चौक कळवा – विटावा – ऐरोलीहून – ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छितस्थळी जातील. घोडबंदर रोड व ठाणे शहरांतून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेऊन एलबीएस रोडने माॅडेला चेक नाका मार्गे इच्छितस्थळी जातील. घोडबंदर रोड व ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ही तीन हात नाका, महालक्ष्मी मंदिर कट सर्व्हिस रोडने कोपरी ब्रिज, कोपरी सर्कल – बारा बंगला – फाॅरेस्ट आँफिस – माँ बाल निकेतन स्कूल- आनंदनगर चेकनाका मार्गे मुंबईकडे इच्छितस्थळी जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -