घरमुंबईदोन सराईत गुंड जेरबंद

दोन सराईत गुंड जेरबंद

Subscribe

गुन्हेगारी कारवाया करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणार्‍या सराईत पोलीस रेकॉर्डवरील आरोपी अजय नंदकिशोर पासी(29) आणि सिद्धेश बाळा म्हसकर उर्फ सिद्धू अभंगे या दोन आरोपींच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव चितळसर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पोलीस आयुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. त्यानुसार कोपरी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सिद्धू अभंगे याला चिपळूण रेल्वे स्टेशनवरून गोव्याला जाण्याच्या तयारीत असतानाच अटक केली. त्यानंतर आरोपी अजय नंदकिशोर पासी यालाही ठाणे पोलिसांनी दिल्लीतून बेड्या ठोकल्या. आता दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील पासी याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

अजय पासी आणि सिद्धू अभंगे यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. चितळसर पोलिसांनी अभंगे आणि पासी यांच्यावर दाखल जबरी गुन्ह्यानंतर त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून कारागृहात रवानगी करणायचा प्रस्ताव पोलीस आयुक्त फणसाळकर आणि अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्याकडे पाठविला. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर कोपरी पोलिसांनी गोव्याला पाळण्याच्या तयारीत असलेल्या शाडू अभंगे याला चिपळूण स्टेशनवरून घेण्यात ताब्यात घेतले. त्यानंतर सराईत अजय पासी याचा शोध सुरू केल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते, तर अजय पासी हा फरार झाला होता. तो आपले नाव ठिकाण, मोबाईल नंबर बदलून उत्तरेप्रदेश, रायबरेली, लखनौ, उनाव, गोमती शहरात राहत होता. तसेच पासी हा दिल्लीत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळताच पोलिसांनी दिल्लीत जाऊन पासीला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -