घरमुंबईबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेत दोन गट ?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेत दोन गट ?

Subscribe

मिरवणूक रद्द केल्याने, एका गटाकडून निषेध

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी जयंती आहे. यानिमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. मात्र कल्याणमध्ये बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतील दोन गट तयार झाले आहेत. सलग पाच वर्षापासून निघणारी बाळासोहबांची मिरवणूक यंदाच्यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या एका गटातून सोशल मीडीयावर जाहिर निषेध केला आहे. त्यामुळे कल्याणातील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटयावर आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून २३ जानेवारीला शिवसेना शहर शाखेच्यावतीने बुधवारी भव्य व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. पालिकेने भगवा तलावाच्या काठावर शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक साकारले आहे. या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थितीत राहतात. शहर शाखेने बुधवारी जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. शिवसेनाप्रमुखांनी साकारलेल्या व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन स्मारकस्थळी आयोजित केले आहे. शिवाय, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्यासह कलाप्रेमी कुंचल्याच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहणार आहेत. शिवसेना शहर शाखेतर्फे पत्रकार परिषद घेऊन त्यात ही माहिती देण्यात आली.

- Advertisement -

शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, माजी सभागृह नेते रवी पाटील, सचिन बासरे, रवी कपोते, अरविंद मोरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मात्र पत्रकार परिषदेनंतर साळवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी जयंतीनिमित्त काढली जाणारी मिरवणूक रद्द केल्याच्या निर्णयाला विरोध करत आपला निषेध व्यक्त केला. विजय साळवी हे २०१४ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. विजय साळवी यांच्या या पोस्टमुळे कल्याण शिवसेनेत दोन गट झाल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र, साळवी यांनी ही पोस्ट टाकल्यानंतर त्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने ठाण्याला बोलावून घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

बाळासाहेबांनी शिवसैनिकांना धाडसाने जगायला शिकवले. त्यांची भव्य मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणमध्ये २०१३ पासून भव्य प्रमाणात सलग पाच वर्षे मिरवणूक काढण्यात येत होती. परंतु, यावर्षी कल्याणातील शिवसेनेच्या चार- पाच नेत्यांनी ती मिरवणूक काढायची नाही असा परस्पर निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा मी निषेध करतो. २४ जानेवारीला ही मिरवूणक निघत होती. शाखा- शाखातून येणे ही मिरवणूक होत नाही. बाळासाहेबांच्या अभिवादन मिरवणुकीमुळे शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण होतो आणि ऊर्जा मिळते.
– विजय साळवी, महानगर प्रमुख, शिवसेना

- Advertisement -

विजय साळवी यांच्या पोस्टबद्दल मला काहीही माहित नाही. मात्र कल्याण शहरप्रमख आणि पदाधिका-यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे नेते यांच्या बरेाबर बोलून हा कार्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. वरिष्ठांच्या संमतीने तो कार्यक्रम ठरला असेल तर, त्यावर मी प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही. मी कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. तो शिंदेसाहेबांचा निर्णय आहे.
– गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाप्रमुख, शिवसेना

सुरूवातीला एकत्रित अभिवादन यात्रा निघत होती. ती आपण रद्द केली आहे. पण, आता प्रत्येक शाखांतून ही मिरवणूक स्मारकाजवळ येणार आहे. तसे प्रत्येक शाखेला सांगण्यात आले आहे. विजय साळवी हे आमचे वरिष्ठ आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही काम करतो. शिवसेनेत कोणतेही गट नाहीत. त्यांचा गैरसमज झाला असेल तर दूर करण्यात येईल.
– विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -