घरमुंबईमुंबईकरांसाठी 'बेस्ट'चे महत्वाचे दोन निर्णय; बस पाससह डबल डेकर ई - बस...

मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चे महत्वाचे दोन निर्णय; बस पाससह डबल डेकर ई – बस सेवा

Subscribe

बेस्टने आणखी दोन म्हत्वाचे निर्णय घेतले आहेत. बेस्टचे हे दोन निर्णय प्रवाशांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. एका रुपयात सात दिवसांचा बस पास आणि डबल देकार ई - बस सेवा देणायचे महत्वाचे दोन निर्णय बेस्ट तर्फे घेण्यात आले आहेत.

मुंबईची लाईफलाईन(mumbai lifeline) अशी ओळख असलेली मुंबईची ‘बेस्ट बस'(best) लोकल प्रमाणेच मुबईकरांच्या सेवेत नेहमी तत्पर असते. बेस्ट नेहमीच तिच्या प्रवांशांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुखद अनुभव देत असते. मुंबईकरांना आणखी एक सुखद अनुभव देण्यासाठी बेस्ट आता सज्ज झाली आहे. बेस्टने आणखी दोन म्हत्वाचे निर्णय घेतले आहेत. बेस्टचे हे दोन निर्णय प्रवाशांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. एका रुपयात सात दिवसांचा बस पास आणि डबल देकार ई – बस सेवा देणायचे महत्वाचे दोन निर्णय बेस्ट तर्फे घेण्यात आले आहेत.

हे ही वाचा – BEST Mobile Bill Center : मुंबईकरांसाठी बेस्ट सुविधा! रिचार्ज, बिल भरणे झाले सोपे

- Advertisement -

फक्त एका रुपयात सात दिवसांचा बस पास

मुंबईसह संपूर्ण भारतभरातच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बेस्टने(best) दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत, त्यातील एक म्हणजे बेस्टने फक्त एका रुपयात बेस्ट आझादी योजनेची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत चालो ऍपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा म्हणजेच एका आठवड्याचा बस पास हा केवळ एका रुपयात डाऊनलोड करता येणार आहे. यामध्ये प्रवाशांना वातानुकुलीत किंवा विना वातानुकूलित बस मध्ये सात दिवसांमध्ये कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

१५ ऑगस्ट २०२२ पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्य दिनापर्यंत या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. सद्य स्थितीत ३३ लाख प्रवाशी रोज बेस्टने प्रवास करतात त्यापैकी २२ लाख प्रवासी चालो ऍपचा वापर करतात, तर ३. ५ लाख प्रवासी डिजटल तिकीट प्रणालीचा वापर करतात.

हे ही वाचा – BEST Electric Bus : बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बस दाखल होणार

बेस्टच्या ताफ्यात डबल डेकर ई – बस

आत्तापर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त डिझेलवर चालणाऱ्या डबल डेकर बस होत्या , पण मुंबईकरांना(mumbai) प्रवासाचा सुखद अनुभव देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात ९०० डबल डेकर बस घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने काही दिवसांपूर्वीच घेतला. बेस्टच्या डबल डेकर बस या जास्त प्रवासी वाहतुक क्षमतेच्या आहेत. आता इलेकट्रीक बसच्या पर्यायामुळे इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने अधिक प्रवासी क्षमतावाढ सुद्धा शक्य होणार आहे. वर्षा अखेर पर्यंत या डबल डेकर ई – बस मुंबईच्या रस्त्यांवर धावणे अपेक्षित आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -