घरमुंबईशहरात दोन घटनेत घातक शस्त्रांसह दोघांना अटक

शहरात दोन घटनेत घातक शस्त्रांसह दोघांना अटक

Subscribe

खार आणि एमएचबी पोलिसांची धडक कारवाई

शहरात दोन घटनेत घातक शस्त्रांसह दोघांना खार आणि बोरिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली. खार आणि एमएचबी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. यातील एका गुन्हेगाराविरुद्ध हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहिसर येथे काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती एमएचबी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांच्या पथकातील धोत्रे, निरगुडे व अन्य पोलीस पथकाने न्यू लिंक रोडवरील तुकाराम ओंबळे गार्डन परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. रविवारी सायंकाळी तिथे शेखर श्रीनिवास शेट्टीयार (31) आला असता त्याला पोलिसांनी ओळखले. पळून जाण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस सापडले. त्याला पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

ही घटना ताजी असतानाच पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने खार परिसरातून गौरवप्रताप विरेंद्र सिंग या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तीन देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गौरवप्रताप हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी असून तेथून तो काही घातक शस्त्रे मुंबई शहरात घेऊन आला होता. या शस्त्रांची विक्रीसाठी तो नॅशनल कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकातील नंदकुमार गोपाळे, काटकर व अन्य पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून त्याला सोमवारी शिताफीने अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -