घरताज्या घडामोडीखुशखबर; सोमवारपासून वेस्टर्नला २ लेडीज स्पेशल लोकल धावणार

खुशखबर; सोमवारपासून वेस्टर्नला २ लेडीज स्पेशल लोकल धावणार

Subscribe

पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या सहा महिन्यानंतर सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर दोन लेडीज स्पेशल लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विरार ते चर्चगेटसाठी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी चर्चगेट-विरार लोकल रवाना होणार आहे. या सर्व फेर्‍या धीम्या मार्गावरून धावणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवते अनेक क्षेत्रातील नागरिकांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी वाढली असून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजत आहे. ही गंभीर बाब लक्षात येताच नुकतेच मध्य रेल्वेने तब्बल ६८ लोकल फेर्‍या वाढविल्या आहेत. तसेच त्याच पाठोपाठ आता पश्चिम रेल्वेने सुद्धा सोमवारपासून सहा फेर्‍यांची वाढ केली आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गांवर एकूण ५०६ लोकल फेर्‍या धावणार आहेत. यासहा लोकल फेर्‍यामध्ये तीन लोकल फेर्‍या या विरार ते चर्चगेट अशा अप धीम्या मार्गावर धावतील तर तीन फेर्‍या चर्चगेट ते विरार अशी धीम्या डाउन मार्गावर धावणार आहेत. यामध्ये दोन लेडीज स्पेशल ट्रेनचा समावेश असणार आहे. कारण १ सप्टेंबरपासून खासगी आणि शासकीय कार्यालय कर्मचार्‍यांची उपस्थितीची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांची संख्या वाढली असून महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी पिक अवरमध्ये महिला विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

विरार ते चर्चगेटसाठी सकाळी ७. ३५ ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट ते विरार लोकल रवाना होणार आहे. या सर्व फेर्‍या धीम्या मार्गावरून धावतील. यामुळे आता महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

५०६ लोकल फेर्‍या

कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन काळा उपनगरीय लोकल सेवा सुध्दा बंद करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र शासनाच्या आग्रहानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठी १५ जून २०२० पासून मर्यादित लोकल सेवा सुरु केली होती. त्यानंतर अनलॉकची सुरुवात होताच कर्मचार्‍याची संख्या वाढल्याने १५० लोकल फेर्‍या वाढविण्यात आलेल्याने आता ३५० ऐवजी ५०० लोकल फेर्‍या चालविण्यात येत आहे. आता सोमवारपासून आणखी ६ लोकल फेर्‍या वाढविण्यात आल्या आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -