Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईAccident News : दारु पिऊन मौजमजा जीवावर बेतली; भीषण अपघातात दोन अल्पवयीन...

Accident News : दारु पिऊन मौजमजा जीवावर बेतली; भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Subscribe

दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे अनेक अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. मात्र त्यानंतरही लोकं काही सुधारण्याचं नाव घेत नाहीत. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्लेजवळ आज पहाटे झालेल्या भीषण दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे अनेक अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. मात्र त्यानंतरही लोकं काही सुधारण्याचं नाव घेत नाहीत. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्लेजवळ आज पहाटे झालेल्या भीषण दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. चालक दारु पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे नंतर समोर आले. याप्रकरणी आरोपी कारचालक साहिल मेहताला विलेपार्ले पोलिसांनी अटक आहे. (Two minors die in a horrific accident in Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल मेहता, जॉर्डन जिमी, जलाल धीर आणि सार्थक कौशिक हे सर्व पार्टी करून शनिवारी (23 नोव्हेंबर) पहाटे 3.30 च्या सुमारास गोरेगावमधून जेवण घेण्यासाठी बांद्रे येथे आले होते. यानंतर जेवण घेऊन हे पुन्हा गोरेगावच्या दिशेने जात असताना विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलजवळ साहिल मेहता या 18 वर्षीय मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार सर्व्हिस रोड व उत्तरेकडील पुलाच्या दरम्यान असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या जलाल धीर आणि सार्थक कौशिक या 18 वर्षीय मुलांचा जागीच मृत्यू झाला. गाडीमधील इतर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई; अलर्ट कॉल येताच पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग, दरोडेखोरांकडून घातक शस्त्रे, मिरची पूड जप्त

गाडी चालवणारा साहिल मेहता हा दारू पिऊन कार चालवत असल्याने अपघात झाल्याची माहिती त्याच्या मित्राने पोलिसांना दिली. यानंतर विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला करत गाडी चालवणाऱ्या साहिल मेहताला अटक केली आहे. साहिल मेहता कार चालवताना किती दारू प्यायला होता? दारूच्या नशेमुळे हा अपघात झाला का? यासंदर्भात ब्लड सॅम्पल घेऊन विलेपार्ले पोलिसांनी तपासासाठी लॅबमध्ये पाठवले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Nashik : भगरे पॅटर्नचा फुसका बार; पाच डमी उमेदवार पराभूत


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -