घरCORONA UPDATECoronaVirus: धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळले

CoronaVirus: धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळले

Subscribe

आशिया खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या धारावी झोपडपट्टीतही कोरोनाने शिरकाव केला असून या परिसरात आणखी दोन कोरोनाबाधिक रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आशिया खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या धारावी झोपडपट्टीतही कोरोनाने शिरकाव केला असून या परिसरात आणखी दोन कोरोनाबाधिक रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. धारावीच्या डॉ. बालिगानगरमध्ये हे दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता धारावीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या सातवर पोहोचली आहे. बालिगानगरमध्ये दिल्लीतील धार्मिक क्रार्यक्रम मरकजहून आलेल्या काही व्यक्ती राहून गेल्या होत्या. त्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. याआधी एका डॉक्टरालाही कोरोनाची बाधा झाली होती. तर दोन दिवसांपूर्वी ३० वर्षीय कोरोना झालेल्या युवतीच्या ८० वर्षीय वडिलांना आणि ४९ वर्षीय भावालाही कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा – Lockdown : देशातला लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता!

- Advertisement -

धारावी बनतोय डेंजर झोन 

धारावीत मागील सहा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे धारावी जस्मिन मिल रोड येथील बलिगा नगर, धारावी मुख्य रस्त्यावरील वैभव अपार्टमेंट, धारावीतील मुकुंद नगर येथील शक्ती चाळ व मदिना नगर आदी भाग बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. धारावीत आतापर्यंत सात रुग्ण तर इतर भागांमध्ये २ रुग्ण अशाप्रकारे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे यासर्व रुग्णांच्या अत्यंत निकटच्या एकूण ५७ निकटच्या लोकांना व त्याखालोखाल संपर्कात आलेल्या १८७ लोकांना क्वारंटाईनमध्ये हलवण्यात आले आहे. त्यामुळे यासर्व भागांना बाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे येथील ३४५० लोकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले, असून तेथील कुटुंबांना आवश्यकतेनुसार जीवनाश्वक वस्तूंसह भाजीपाला व इतर सुविधा पुरवल्या जात आहे. तसेच या विभागांमध्ये जंतूनाशक फवारणीही केली जात आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर 

मुंबईमध्ये कोरोनाचे नवे ७० रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा आता ५२८ वर गेला आहे. तर सोमवारी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८७२ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ५२ वर गेला आहे. गेल्या २४ तासात राज्यात नवे १२४ रूग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -