घरCORONA UPDATEदादरच्या सुश्रुषा रुग्णालयात दोन महिला करोनाबाधित, रुग्णांना घरी सोडण्याचे आदेश!

दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात दोन महिला करोनाबाधित, रुग्णांना घरी सोडण्याचे आदेश!

Subscribe

वोकहार्ट रुग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच दादरमधील सुश्रुषा रुग्णालयातील दोघा नर्सेसना कोरोनाची लागणी झाली आहे. त्यामुळे सुश्रुषा रुग्णालयात नव्याने रुग्णांची भरती बंद करून येथील दाखल रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. दरम्यान या रुग्णालयातील सर्व नर्सेसना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र, एका बाजूला खासगी रुग्णालयात नर्सेसना कोरोनाची लागण होत असतानाच दुसरीकडे शीव रुग्णालयातील नर्सेसला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या नर्सेसच्या निकट संपर्कातील सर्व नर्सेसची तपासणी करण्यात येत आहे.

मुंबईतील सैफी हॉस्पिटल, घाटकोपरचे साई हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयातील नर्सेसना कोरोनाची बाधा झाल्यानंतर दादरमधील सुश्रुषा रुग्णालयातील दोन नर्सेसना याची बाधा झाली. २७ वर्षे आणि ४२ वर्षीय नर्सेसचे चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. येथील नर्सेसना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे नवीन रुग्ण भरती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुढील ४८ तासांमध्ये येथील सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या सूचना महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात २८ नर्सेस असून त्या दोघींच्या संपर्कात आलेल्या अन्य नर्सेसची तपासणी रुग्णालयाने स्वत: करावी आणि पुढील निर्णय घ्यावा, अशाही सूचना महापालिकेने केल्या आहेत.

- Advertisement -

शीव रुग्णालयातही एक नर्सला बाधा

केईएम रुग्णालयातील एमआयसीयू विभागातील सफाई महिला कामगाराला कोरोनाची लागण झालेली असतानाच शुक्रवारी शीव रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या रुग्णालयातील नर्सेसच्या संपर्कातील सर्व नर्सेसची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयातील महिला सफाई कामगाराला कोरोना झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील इतर कामगार,नर्सेस यांनाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे रुग्णालयांनी त्यांना डिस्चार्ज देऊन घरीच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे येथील नर्सेससह १५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे येथील नर्सेसने आपल्या सुरक्षेच्या मागणीबाबत आंदोलनही करत पीपीई किट देण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -