घरनवी मुंबईअपघातात मदतीसाठी गेलेल्या देवदूतांवर नियतीचा घाला

अपघातात मदतीसाठी गेलेल्या देवदूतांवर नियतीचा घाला

Subscribe

सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा यांचा मृत्यू

हायवेवर आधी झालेल्या एका अपघातग्रस्तांना अ‍ॅम्ब्युलन्स आणि आवश्यक मदत देण्यासाठी गेलेल्या दोन रुग्णसेवकांनाच दुसर्‍या अपघातामुळे बळी जावे लागले. ही दुर्दैवी घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेलपासून पुण्याच्या दिशेने साधारण आठ किमी परिसरात मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट टॅक्सीला कंटेनरने मागून धडक दिली. त्याच दरम्यान तेथे पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते (26) आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले आणि इतर दोन जण झालेल्या अपघातात मदत करण्यासाठी आपली मर्सिडीज गाडी घेऊन थांबले होते.

त्यावेळी अचानक मागून आलेल्या आयशर टेम्पोने मर्सिडीजला धडक दिली. या धडकेत पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या समवेत असलेले प्रथमेश बहिरा (24) यांचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत हर्षद खुदकर हे जखमी झाले. त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले हे सुदैवाने अपघातातून बचावले.

- Advertisement -

या अपघातातील जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघात घटनेनंतर आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा पळस्पे, देवदूत, लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी, डेल्टा फोर्स आदी कर्मचार्‍यांनी मदत केली. अपघातात मदतीला थांबलेल्याचा अपघात होणे खूप दुःखद आहे. पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा अपघात घडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -