घरमुंबई३४ लाख रुपयांची फसवणुक भावनगरमधून दोघांंना अटक

३४ लाख रुपयांची फसवणुक भावनगरमधून दोघांंना अटक

Subscribe

मुंबई : मुंबईसह गुजरातच्या दोन नामांकित कंपन्यांची सुमारे 34 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना बुधवारी सायबर सेल पोलिसांनी भावनगर परिसरातून अटक केली. महेशभाई दामजीभाई जाधव आणि महेश ऊर्फ मुन्ना धनजीभाई सोळंखी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार एका खाजगी कंपनीत संचालक म्हणून कामाला आहे. करण नावाचा एक तरुण त्यांचा मित्र असून तो राजकोटच्या एका कंपनीत अध्यक्ष म्हणून काम करतो. ही कंपनीत करण यांच्या कंपनीला ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा पुरविते. त्यासाठी कंपनीने एक सॉफ्टवेअर तयार केले असून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रिचार्ज सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा प्रोजेक्टर तक्रारदार कंपनीच्या मुंबईतील कार्यालयातून सुरु करण्यात आला होता.

- Advertisement -

३४ लाखांचे रिचार्ज

सॉफ्टवेअर मॉनिटरचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत होते. 8 सप्टेंबरला त्यांच्या टिमने ऑगस्ट महिन्यांत किती रुपयांचे रिचार्ज झाले याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता, यावेळी त्यांना रिचार्ज मोठ्या प्रमाणात झाले, पण पेमेंटची रक्कम कंपनीला प्राप्त झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली असता काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कंपनीचे रिचार्ज अ‍ॅप्लिकेशन हॅक करुन त्याद्वारे सुमारे 34 लाख रुपयांचे रिचार्ज केल्याचे दिसून आले.

२४ हजार व्यवहार

मार्च आणि ऑगस्ट महिन्यांत अज्ञात व्यक्तींनी अशाच प्रकारे सुमारे 24 हजार व्यवहार करुन ही फसवणूक केली होती. अशाच प्रकारे दोन्ही कंपनीला लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी लेखी अर्जाद्वारे सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती.

- Advertisement -

आयपी अ‍ॅड्रेसवरून अटक

या तपासात भावनगर परिसरातून कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करुन ही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संबंधित व्यक्तींचे आयपी अ‍ॅड्रेस काढून भावनगर येथून महेशभाई जाधव आणि मुन्ना सोळंखी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -