घरमुंबई...तर दोन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळले असते; अनिल देशमुखांचा दावा

…तर दोन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळले असते; अनिल देशमुखांचा दावा

Subscribe

मुंबई : महाविकास आघाडी सरकार हे शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे पडले, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दावा केला आहे की, मी भाजपा प्रवेशाची ऑफर स्विकारली असती तर महाविकास आघाडी सरकार दोन वर्षांपूर्वीच कोसळले असते. देशमुखांच्या दावामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अनिल देशमुख यांनी टीव्ही ९ मराठी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना वक्तव्य केले.

अनिल देशमुख म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे काही प्रस्ताव आले होते. त्यावेळी मी जर वाटाघाटी केली असती तर माझ्यावर ईडीची कारवाई झाली नसती. पण वाटाघाटीमुळे दोन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळले असते. मला तसे नको होते म्हणून मी सगळा त्रास सहन केला. मी कोणावर खोटे आरोप करणार नाही, पण मी तडजोड करायला नकार दिल्यामुळे मला सगळं भोगावे लागले, असे अनिल देशमुख म्हणाले. (Anil Deshmukh Claimed Mahavikas Aghadi government Two years ago collapsed)

- Advertisement -

काही पुरावे शरद पवारांनाही दाखवले
ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले की, अनिल देशमुखांना कोणती ऑफर होती आणि त्यांच्यावर कुठला दबाव त्यांच्यावर होता हे मला माहित आहे. देशमुखांकडे त्यासंदर्भातले पुरावे आणि व्हिडीओ क्लीप्स आहेत. अनिल देशमुख यांची कोणी भेट घेतली, त्यांना कुणी ऑफर दिली, त्यांच्याशी कोण काय बोलले, त्यांच्याकडून कोणत्या सह्या घेण्याचा प्रयत्न केला आणि कोणावर आरोप करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता, ही सगळी माहिती त्यांच्याकडे होती. त्यांनी यासंदर्भात काही पुरावे शरद पवार यांनाही दाखवले होते, असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

काय आहे प्रकरण?
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता. व्यावयासियांकडून दरमहा 100 कोटी वसुली करण्याचे आदेश अनिल देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते, असा आरोप या लेटर बॉम्बमधून करण्यात आला होता. या पत्राची दखल घेत 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीअंती देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सीबीआयने देशमुख यांच्या जामिनावरील स्थगितीला मुदतवाढ देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे अनिल देशमुख यांची जामीनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -