Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी श्रीमलंगगड भागात दोन तरुणींना बेदम मारहाण

श्रीमलंगगड भागात दोन तरुणींना बेदम मारहाण

तरुणांनाही चोप, सहा टवाळखोरांवर गुन्हा

Related Story

- Advertisement -

पावसामुळे निसर्गरम्य वातावरणाने सजलेल्या श्रीमलंगगड परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींनी तोकडे कपडे घातल्याचे कारण सांगून 6 टवाळखोरांनी दोन्ही तरुणींना बेदम मारहाण करताना विनयभंग केला. तसेच सोबत असलेल्या तरुणांनाही चोप दिला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पलावा डोंबिवली येथून दोन तरुण-तरुणी श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. तरुणींनी तोकडे कपडे घातल्याचे कारण सांगत त्यांना मारहाण केली. तितक्यात तिथे आलेल्या 6 जणांच्या टोळक्यांनी तोकडे कपडे घातल्यावरून तरुणींना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या तरुणांनाही चोप दिला.

- Advertisement -

टोळक्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करणार्‍या दोघांनी गाड्या काढून तिथून निघण्यास सुरुवात केली असता मागे बसलेल्या तरुणींच्या कपड्यांना खेचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेवटी कशीबशी सुटका करून तिथून निघालेल्या चौघांनी नेवाळी पोलीस चौकी गाठली आणि प्रकार सांगितला. त्यांना हिललाईन पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आल्यावर त्यांनी रात्री उशिराने हिललाईन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले असून सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी आरोपीच्या शोधासाठी श्रीमलंगगडाच्या परिसरात पथके रवाना केली आहेत.

- Advertisement -