घरताज्या घडामोडीमुंबईतील मिठी नदीत दोन जण बुडाले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरू

मुंबईतील मिठी नदीत दोन जण बुडाले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरू

Subscribe

मुंबईतील मिठीनदीत दोन जण बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोन जणांमधील एकाचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध सुरू आहे. हे दोघ जण कुर्ल्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईतील मिठीनदीत दोन जण बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोन जणांमधील एकाचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध सुरू आहे. हे दोघ जण कुर्ल्याचे असल्याचे सांगितले जात आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. (two youth fall in mithi river in Mumbai at yesterday night one dead)

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील दोघे जण गुरूवारी रात्री लघुशंकेसाठी माहीमच्या खाडीवर उभे होते. त्यावेळी एकाचा पाय सरकला आणि तो थेट नदीत पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने नदीत उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांनी बचाव कार्याला सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी त्यानंतर एकाचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला आहे. परंतु, दुसऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत माहिम खाडीवर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.

मुंबई बुडालेल्या तरुणांचा शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोध घेतला जात आहे. कारण मुंबईत पाऊस असल्याने शोध कार्यात अनेक अडचणी येत आहेत. एका तरुणाचा मृतदेह पाण्यासोबत किनाऱ्यावर आला आहे. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला असून रुग्णालयात दाखल केला आहे.

- Advertisement -

मुंबईत पावसाचा जोर वाढला असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच, राज्यातही मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील नद्यांना पूर आला आहे. आत्तापर्यंत पूरातून वाहून अनेकजण गेले आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्यात कोणीही उतरू नका असे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – ‘लवकरच सगळ्या गोष्टी होतील…’; मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -