घरमुंबईUday Samant : आमच्या जागा आम्हाला द्या; शिवसेनेची भूमिका

Uday Samant : आमच्या जागा आम्हाला द्या; शिवसेनेची भूमिका

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या जागावटपावरुन महायुतीमध्येही तिढा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) अनेक जांगावर भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. रामटेक, सिंधुदुर्गनंतर आता छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरही भाजपनं दावा केल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमधून केंद्रीय मंत्र्यांना भाजप मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह महायुतीत जागावाटपावरुन राजकारण रंगत असल्याचे चित्र आहे. यातच शिवसेना (शिंदे गट) त्यांच्या पूर्वीच्या जागेवर दावा ठोकत असून, दुसरीकडे भाजपकडून काही जागा शिवसेनेकडून घेऊ पाहत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. (Uday Samant Give us our seats Role of Shiv Sena)

लोकसभा निवडणुकीच्या जागावटपावरुन महायुतीमध्येही तिढा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) अनेक जांगावर भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. रामटेक, सिंधुदुर्गनंतर आता छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरही भाजपनं दावा केल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमधून केंद्रीय मंत्र्यांना भाजप मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडनूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर असताना आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही 45 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा : Sanjay Raut: पंतप्रधान खोटं बोलतात; आधीच्या आणि आताच्या विधानांमध्ये तफावत, राऊतांचा आरोप

- Advertisement -

याबाबत आज उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्राचा विकास होतोय त्यामुळे लोकांचा सरकारवर विश्वास आहे. या सरकारचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने त्यांनी 45 जागा जिंकू असे सांगितले. यामध्ये काही वावगं आहे? असाही सवाल सामंत यांनी विचारला.

हेही वाचा : Drug case : …पण देश सध्या एका वेगळ्याच नशेत आहे, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

पुढे बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काल दापोलीत होते. ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये कुठेही काहीही लपविण्यासारखं काही नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथे जिथे पूर्वी शिवसेने ज्या जागा लढविल्या त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे. एकूणच शिवसेना त्यांच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जागावर दावा ठोकत असल्याचे चित्र आहे. तेव्हा महायुतीतील जागावाटपाचा तिढा कसा सुटेल हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -