घरताज्या घडामोडीMumbai Metro : मुंबईकरांच्या प्रेमासाठी केंद्रात अडलेले प्रकल्प मार्गी का लावत नाहीत?...

Mumbai Metro : मुंबईकरांच्या प्रेमासाठी केंद्रात अडलेले प्रकल्प मार्गी का लावत नाहीत? श्रेयाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

Subscribe

मेट्रोच्या श्रेयाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. मुंबईतील विविध प्रकल्पांसाठी जागा देण्यासाठी केंद्राकडून करण्यात येणाऱ्या अडवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. मुंबईकरांच्या गरजेसाठी हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विरोधक का मदत करत नाहीत ? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्राकडे रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या, तुम्हाला श्रेय मी देतो अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या कामाच्या श्रेयाच्या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधला. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

केंद्राकडे प्रकल्प मार्गी लावावेत

बुलेट ट्रेनसाठी आग्रह एकीकडे होत आहे. त्यासाठी बीकेसीतील जागा केंद्राकडून राज्य सरकारकडे मागण्यात येत आहे. कारण अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठीची ही धडपड सुरू आहे. मुंबईकरांची इतकीच काळजी आहे, तर कांजुरची ओसाड पडलेली जमीन मेट्रो प्रकल्पासाठी का देत नाही ? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ही जमीन मिळाली तर बदलापूर अंबरनाथपर्यंत मेट्रो जाऊ शकते, भविष्यातील ही गरजच असणार आहे. दुसरीकडे मुंबई पंपिंग स्टेशनसाठी जागा केंद्राकडे मागण्यात येत आहे. तसेच धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन मागण्यात येत आहे, पण या गोष्टी अडवून ठेवल्या आहेत. जेव्हा विरोधक आम्हीच दावा केला आहे, असा दावा करत आहेत तेव्हा मुंबईकरांसाठी अडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

मुंबई नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन करा

देशात सर्वाधिक जीएसटीच्या माध्यमातून महसूल देणारे शहर महाराष्ट्र आहे. मुंबई ही आर्थिक क्षमतेच्या बाबतीत पाठकणा आहे. बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई बांधण्याचा प्रकल्प आहे. पण यामधून नेमका कोणाला फायदा होणार आहे ? असाही सवाल त्यांनी केला. त्याएवजी आर्थिक राजधानी मुंबईसोबत उपराजधानी असलेल्या नागपूरला जोडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. आम्ही कोणाकडे भीक मागत नाही. जेव्हा लढायच त्यासोबत लढल्याशिवाय राहणार नाही. ती वेळ येऊ देऊ नका. गुण्यागोविंदाने काम सुरू आहेत. त्यामुळे आधीच्या सरकारमध्ये सुरू झालेले प्रकल्प आम्ही थांबवले नाही. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे आडमुठीपणाची भूमिका ठेवू नका असेही ते म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -