भायखळ्यातील शिवसैनिकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना विचारला जाब

जे होईल त्यासाठी तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना आणि अप्रत्यक्षपणे राज्य सरकारला दिला.

uddhav thackreay

मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा विधानसभेवर(byculla vidhansabha) शिवसेनेचा(shivsena) भगवा फडकला. भायखळा विधानसभेतील मतदार प्रत्येक निवडणुकीला एका वेगळ्या नेत्याला निवडून देतात. अशातच गेल्या निवडणुकीत भायखळ्यातील मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली. त्यासाठी शिवसैनिकांनीही जोमाने तयारी केली होती.

भायखळा येथील शाखा क्र. २०८ मधील शिवसैनिकांवर तलवारीने गुरुवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र पोलिसांकडून याविरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. भायखळ्यातील शिवसेना शाखेला भेट देत झालेल्या हल्ल्याबद्दल शिवसैनिकांची विचारपूस केली. यावेळी पोलिसांना हल्लेखोरांचा शोध का लागला नाही, असा सवाल करताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. जे होईल त्यासाठी तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना आणि अप्रत्यक्षपणे राज्य सरकारला दिला.

हे ही वाचा –  मुख्यमंत्र्यांचा आज माईक ओढला, उद्या पँट ओढतील; विनायक राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

भायखळ्यातील शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर गुरुवारी अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला. याबाबत पोलीस तक्रार करूनही केवळ अदखल पात्र गुन्हा नोंद करून घेण्या पलीकडे पोलिसांनी काहीही केले नाही, अशी तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पोलीस अधिकार्‍यांना धारेवर धरले. शिवसैनिकांचे रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचे आवाहन करतोय. पण हे जर होणार असेल तर शांत बसणार नाही, मग जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही असाल, अशा शब्दात आपला संताप व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी हल्लेखोरांचा तपास अजून का झाला नाही, असा जाब पोलिसांना विचारला.

हे ही वाचा – cm uddhav thackeray : महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

तुम्ही राजकारणात तुम्ही पडू नका! पोलिसांवर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. अशा परिस्थित जे काही केले जात आहे ते सूडाचे राजकारण आहे. गुन्हा देखील नोंदवला जात नाही. अशा राजकारणात तुम्ही पडू नका, राजकारण जे काही करायचे ते आम्ही करू. पण जर शिवसैनिकांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर शांत बसणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्यावर शिवसैनिकांनी संशय व्यक्त केला असता उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना तुम्ही त्यांचा जबाब नोंदवला का असा प्रश्न केला. जर कुणाविषयी संशय निर्माण होत असेल तर त्यांचाही जबाब नोंदवा, अशाही सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या.आपल्याकडे करतेकरविते, खरे कारभार करणारे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना जाब विचारा. जर पोलीस संरक्षण करणार नसतील, तर शिवसैनिक स्वत:चे संरक्षण करायला समर्थ आहेत. पोलिसांनी हात वर करावेत आणि मग वेडेवाकहे काही झाले तर त्याला तुम्ही जबाबदार राहाल, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

हे ही वाचा –  संजय पवारांनी शिवसेनेच्या मेळाव्यात ऐकवली राजेश क्षीरसागरांची ऑडियो क्लिप, हकालपट्टीची मागणी