Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईUddhav Thackeray : पक्ष गेला, सत्ता गेली, आता पराभवानंतर ठाकरेंनी पुन्हा रणशिंग...

Uddhav Thackeray : पक्ष गेला, सत्ता गेली, आता पराभवानंतर ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं; म्हणाले, “ते फडण’वीस’ असले तरी आपण…”

Subscribe

Uddhav Thackeray News : शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीत फक्त 20 आमदार निवडून आले आहेत. मात्र, पराभव पचवत उद्धव ठाकरे पुन्हा कामाला लागले आहेत.

शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं. पक्ष, चिन्ह, कार्यकर्ते, नेते, आमदार सोडून गेले. मात्र, लोकसभेला उद्धव ठाकरे सामोरे आणि 9 खासदार निवडून आणले. परंतु, विधानसभेला उद्धव ठाकरे यांना मोठा सेटबॅक बसला. ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 20 आमदार निवडून आले. एवढे होऊनही शांत बसतील, ते ठाकरे कसले.

नवनिर्वाचित 20 आमदारांची मुंबईत बैठक बोलवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘बिहार पॅटर्न’नुसार मुख्यमंत्री करा, शिंदे गटाची मागणी; भाजपचे नेते म्हणाले…

“ते फडण’वीस’ असले तरी आपण ‘वीस’ आहोत. आपण त्यांना पुरून उरू,” असा कॉन्फिडन्स उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याच वेळी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्यावर मोठी जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

- Advertisement -

भास्कर जाधव यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रतोदपदी पुन्हा सुनील प्रभू यांना जबाबदारी दिली आहे. तर, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

“गटनेता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे. खरं तर माझं म्हणण होतं की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात यावे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला. त्यामुळे मी गटनेता म्हणून शिवसेनेचं काम करणार असून सर्व प्रश्न मांडणार आहे,” असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘गद्दार’ अन् ‘पाडा-पाडा’ केलेलं आवाहन, आता निवडून येताच वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -