घरमुंबईएकत्रित बसून चर्चा केल्यास मार्ग निघेल - उद्धव ठाकरे

एकत्रित बसून चर्चा केल्यास मार्ग निघेल – उद्धव ठाकरे

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून संप पुकारला आहे. याविषयी आज उद्धव ठाकरे यांनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मार्ग निघेल असा विश्वास बेस्ट कर्मचाऱ्यांना दिला आहे.

आपल्या विविध मागण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सहावा दिवस आहे. तरी देखील संप मिटण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मार्ग निघेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. संपाचा निर्णय आता कोर्टाकडे आहे. तरी देखील माझी गरज असेल तर चर्चेला तयार आहे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. बेस्टची आर्थिक स्थिती खराब असून, जर चर्चा केली तर नक्कीच मार्ग निघेल. संपा दरम्यान आम्ही बसून चर्चा केली पण तोडगा निघू शकलेला नाही. बजेटचं विलीनीकरण करण्याचं आश्वासन मी दिलं होतं ते पूर्ण करू असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत.

बेस्टच्या संपात राजकारण आणू नका

बेस्टच्या संपात कुणीही राजकारण आणू नये. तसेच बेस्टच्या संपात राजकारण आणण्याची माझी इच्छा नसल्याचे सांगत ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही त्यांनी विनाकारण यात पडू नये, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसेवर टीका केली आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत त्या करायला हव्यात, असे देखील ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही

खाजगीकरण हा अंतिम पर्याय नसून, खाजगीकरण जरी करायचा विचार समोर आला तरीही मालकी हक्क आम्ही जाऊ देणार नाही. तसेच संपूर्ण खाजगी करणं होऊ देणार नाही आणि झालं तर फक्त काही बस गाड्यांचे असू शकेल मात्र यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेस्टची तिजोरी ही रिकामी झालेलीच आहे. त्यामुळे अवाजवी मागण्या केल्या तर अजून समस्या निर्माण होतील, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


वाचा – शिवसेनेला पटकणारा कोणी पैदा झाला नाही – उद्धव ठाकरे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -