Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईThackeray group & MVA : ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार का? संजय...

Thackeray group & MVA : ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊत स्पष्टच म्हणाले…

Subscribe

महाराष्ट्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी ठाकरे गटाच्या बैठकीत पुढे आल्याचे सांगण्यात येते.

(Thackeray group & MVA) मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी ठाकरे गटाच्या बैठकीत पुढे आल्याचे सांगण्यात येते. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. (uddhav thackeray to leave mva after maharashtra loss, what sanjay raut says)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288पैकी 230 जागा जिंकल्या. त्यात भाजपाने इतिहासातील सर्वोच्च 132 जागांचा आकडा गाठला. तर दुसरीकडे, महाविकास आघाडी 46 जागांवर मर्यादित राहिली. त्यात ठाकरे गटाला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मंगळवारी मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत काही नेते आणि पराभूत उमेदवारांनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, असे मत व्यक्त केल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – Raut Vs Shinde : बाळासाहेबांचे नाव घेऊ नका, मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतांचा शिंदेंना टोला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना यासंदर्भात विचारले असता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता त्यांनी पूर्णपणे फेटाळली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपण स्वतंत्रपणे लढायला पाहिजे होते, अशी काही कार्यकर्त्यांची भूमिका असते. या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात. जिंकलेल्या उमेदवारांचे मात्र तसे म्हणणे नाही. म्हणून सध्यातरी अशा प्रकारच्या बातम्या विश्वास ठेवण्याजोग्या नाहीत, असे खासदार राऊत म्हणाले.

- Advertisement -

याच्याशिवाय, विधानसभा निवडणुकीचा आत्ताच निकाल लागला आहे. त्याने तिन्ही पक्षांना धक्का बसला आहे. या निकालासंदर्भात सर्वच पक्षांचे चिंतन, मंथन आणि अभ्यास सुरू आहे. कारणे शोधली जात असून, कारणांची दिशा ईव्हीएमकडे तसेच ज्या पद्धतीने पैसे वापरले तिथे जात आहे. म्हणूनच आम्हाला तिघांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. काल, बुधवारीही आम्ही राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा केली, असे त्यांनी

लोकसभा निवडणुका आम्ही एकत्र लढल्याचा फायदा झाला, हे सुद्धा विसरता येणार नाही. विधानसभेत दुर्दैवाने यश मिळाले नाही. भविष्याचा विचार करता आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेऊ. तसेच 288 मतदारसंघांमध्ये आम्हाला लक्ष घालावेच लागेल, असे ते म्हणाले. (uddhav thackeray to leave mva after maharashtra loss, what sanjay raut says)

हेही वाचा – Sanjay Raut : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार का? राऊत म्हणतात…


Edited by Manoj S. Joshi

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -