घरमुंबईयुतीच्या फॉर्म्युल्यावर न बोलण्याचे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या नेत्यांना आदेश

युतीच्या फॉर्म्युल्यावर न बोलण्याचे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या नेत्यांना आदेश

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र संयमाची भूमिका घ्या कुणीही माध्यमांशी युतीच्या जागा वाटपा बाबत अधिकृत प्रतिक्रिया देऊ नका असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचा ५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यामुळे आता कुणाला किती जागा सोडल्या जाणार अशी चर्चा सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र शिवसेनेच्या नेत्यांना जागा वाटपाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देऊ नका असे आदेश दिल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी कुणाला किती जागा सोडल्या जातील यावर सविस्तर चर्चा झाली असून, भाजपाच्या इतर नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रीया आली तरी त्याला उत्तर देऊ नका असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले.  दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, शिवसेना १३५ आणि भाजपा १३५ जागा विधानसभेत लढणार असून, उरलेल्या १८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. यावर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मित्रपक्षांना आमच्या जागा आम्ही का सोडाव्यात असा सुरू शिवसेनेतून उमटत होता. तसेच शिवसेना १४० जागा लढवणार असा देखील एक सुर शिवसैनिकांकडून ऐकायला येत होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र संयमाची भूमिका घ्या कुणीही माध्यमांशी युतीच्या जागा वाटपा बाबत अधिकृत प्रतिक्रिया देऊ नका असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले.

म्हणून  उद्धव ठाकरेंचे नेत्यांना शांत रहाण्याचे आदेश – 

मागील चार वर्षे  शिवसेनेने वारंवार भाजपावर टीका केली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी हे दोन्ही पक्ष सर्व मतभेद विसरून एकत्र आले. मात्र आता कोणत्याही नेत्याच्या वक्तव्यामुळे युतीमध्ये पुन्हा तणाव नको ही काळजी उद्धव ठाकरे घेत असून, यामुळेच युतीच्या जागा वाटपाबाबत कुणीही जास्त बोलू नका असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बुधवारी माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना युतीच्या फॉर्म्यूल्यावर विचारले असता त्यांनी देखील माध्यमांशी जागा वाटपाबाबत बोलणे टाळले. दरम्यान आपलं महानगरने शिवसेनेच्या काही प्रवक्त्यांना विचारले असता त्यांनी देखील जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आधीच चर्चा झाली असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -