घरताज्या घडामोडीउल्हासनगराला यंदाच्या उकाड्यात ५० एमएलडी वाढीव पाणीपुरवठा

उल्हासनगराला यंदाच्या उकाड्यात ५० एमएलडी वाढीव पाणीपुरवठा

Subscribe

यंदाच्या उकाड्यात पाण्याच्या संकटातून दिलासा

बारवी धरणातून नवी – मुंबईला पाणी पुरवठा केला जात होता.आता तिथे धरण झाल्याने तिकडे जाणारे 50 एमएलडी पाणी उल्हासनगरकडे वर्ग करण्याचे आदेश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही उल्हासनगरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

चिखलोली धरणाचे काम पूर्ण होईपर्यंत अंबरनाथला 6 एमएलडी पाणी दिले जाणार असल्याने या शहरालाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे . उल्हासनगर व अंबरनाथच्या पाणीप्रश्ना संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ.बालाजी किणीकर,महापौर लिलाबाई आशान हे शासन स्तरावर पाठपुरावा करीत होते, त्याच अनुषंगाने आज पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या दालनात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एमआयडीसी,जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

बारवी धरणातून नवी मुंबई करीता पाणीपुरवठा करण्यात येत होता, पंरतु, नवी मुंबई करिता स्वतंत्र धरण झाले असल्याने नवी मुंबई करिता राखीव असलेला कोटा उल्हासनगर शहराकरिता वर्ग करून वाढीव 50 एमएलडी पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्यात यावा असे आदेश बनसोडे यांनी दिले. तसेच अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचे काम सध्या जलसंपदा विभागामार्फत हाती घेण्यात आले असून सद्या धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
यामुळे शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने धरणाच्या उंची वाढवण्याचे काम पूर्ण होऊ पर्यंत एमआयडीसी मार्फत 6 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात यावा व धरणाची उंची वाढवण्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे अशा सूचना ही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. गेल्या आठवड्यात चिखलोली पम्पिंग स्टेशनवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता, या कर्मचाऱ्यांबाबत ही चर्चा करण्यात आली असुन त्यांचा ही प्रश्न मार्गी लावण्यात आला असल्याचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीलाशिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख,सभागृहनेते राजेंद्र चौधरी, महापौर लिलाबाई आशान, उपशहर प्रमुख,नगरसेवक अरुण आशान, गटनेते राजेश शिर्के,नगरसेवक धंनजय बोडारे, सुभाष साळुंखे, रवींद्र पाटिल, विभाग प्रमुख सचिन गुडेकर, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, मजीप्रासदस्य सचिव डॉ.उदय महाजन, अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी देविदास पवार, मजीप्रा अधीक्षक अभियंता मनीषा पालांडे, ठाणे पाटबंधारे मंडळ अधीक्षक अभियंता विजय घागरे, कार्यकारी अभियंता एन. डी.महाजन, अवर सचिव कुरणे, एमआयडीसी कार्यकारी अभियंता आर.जी.राठोड आदी उपस्थित होते.
उल्हासनगरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -