घरताज्या घडामोडीउल्हासनगरवासीयांना 'करोना'ची भीती नाही; महिला पोलीस अधिकाऱ्याची व्यथा

उल्हासनगरवासीयांना ‘करोना’ची भीती नाही; महिला पोलीस अधिकाऱ्याची व्यथा

Subscribe

उल्हासनगर येथील रहिवाशी करोनाला घाबरत नसल्याची प्रतिक्रिया त्याठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस महिलेंनी दिली आहे.

उल्हासनगर शहरातील ड्युटीचा पहिलाच दिवस. सकाळपासून नागरिकांना हात जोडून तिने सगळ्यांना घरात बसण्याचे आवाहन केले. शेवटी तिने हात सोडून सांगायला सुरुवात केली आणि चौक खाली झाला. उल्हासनगर शहरात लॉकडाऊन नंतरही नागरिक घरात बसण्यास तयार नाहीत. विशेषतः हातावर पोट भरणाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कामाच्या शोधात ते बाहेर पडतात. या व्यतिरिक्त फक्त शहर बंद आहे की नाही, हे तपासण्यासाठी गाडीवर बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील नागरिकांना करोना व्हारसची भीती नाही, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सादळकर यांनी दिली आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्याची व्यथा

कोल्हापूरच्या अंबप वाडीत राहून समाजशास्त्र शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. २०१७ मध्ये निकाल आला. २०१८ ला नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. विशेष प्रशिक्षण म्हणून राजस्थानमधील पाक सीमेवर पंधरा दिवस काढले. पण, उल्हासनगरमध्ये पहिल्याच दिवशी दृष्टीस पडलेला राहिवाशांचा बेशिस्तपणा आणि त्यातून परिस्थिती कशी हाताळायची हे प्रशिक्षण फक्त अनुभवातून मिळाले, असे प्रियांका सादळकर यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रशिक्षण घेत असताना उल्हासनगरमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काही दिवस तैनात होती. दोन महिन्यांपूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात नियुक्ती होऊन उल्हासनगरमध्ये पाठविण्यात आले. उल्हासनगर पोलीस ठाण्यात ड्युटीवर आल्यावर वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक रणवीर बायेस, संतोष गोरे यांनी मंगळवारी वैद्यकीय आपत्कालीन जाहीर झाल्यांनातर रस्त्यावर उतरण्याची संधी दिली. सकाळपासून पायी फिरणाऱ्या, मोटार सायकल वरून फिरणाऱ्यांना घरी जावा, अशा विनवण्या केल्या. मात्र, उल्हासनगरचे लोक ऐकत नाहीत, हाच अनुभव आला. अखेर सायंकाळी वर्दळ कमी करण्यासाठी रस्त्यावर काठी घेऊन उतरावे लागेल. त्यानंतर नेहरू चौकात बिनकामी पादचारी आणि वाहन चालकांची गर्दी कमी झाली.

उल्हासनगर शहर हे आर्थिक दृष्ट्या सदन असलेल्या लोकांचे आहे. शहरात प्रत्येक घरात फ्रीज आहे. महिलांनी घरात फ्रीज आहे, त्याचा वापर करा. सात दिवसांची भाजी फ्रिजमध्ये टिकून राहते. थोडं स्वस्त मिळतं म्हणून दूरच्या दुकानात जाऊन खरेदी करणे महिलांनी टाळायला हवे. नजीकच्या दुकानातून खरेदी करा आणि करोना व्हायरसचे संक्रमण टाळा. लहान मुलांना घराबाहेर घेऊन येऊ नका, असे आवाहन प्रियांका सादळकर यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – coronavirus : दादा माणूस ! 50 लाखांचे तांदूळ गरजूंना दान


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -