घरदेश-विदेशCovid-19 हंगामी आजार होणार; संयुक्त राष्ट्राचं मोठं विधान

Covid-19 हंगामी आजार होणार; संयुक्त राष्ट्राचं मोठं विधान

Subscribe

भारतासह जगातील बऱ्याच देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी प्रत्येक देशाचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा भीतीपोटी संयुक्त राष्ट्राने धक्कादायक विधान केले आहे. संयुक्त राष्ट्राने अर्थात (United Nations) ने असे म्हटले की, ‘कोरोना व्हायरस लवकरच हंगामी रोगाचे रूप (Seasonal Disease) धारण करण्याची शक्यता आहे. चीनमध्ये पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आज एक वर्ष होऊन गेले तरीही वैज्ञानिकांना या आजाराचे गूढ सोडविता आले नाही. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात साधारण २.७ दशलक्ष लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोना व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या एका टीमने कोरोनाच्या प्रसाराविषयी माहिती मिळविण्यासाठी हवामानशास्त्र आणि हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. यानंतर त्यांच्या परिणामाबद्दल माहिती जमा करण्याचा देखील प्रयत्न केला. या अभ्यासानुसार, वैज्ञानिकांना असे आढळले की, कोरोना व्हायरस हा आजार हंगामी आजार म्हणून राहू शकतो. इतकेच नाही तर सर्दी, खोकला या हंगामी आजारांप्रमाणेच कोरोना आपल्याला त्रास देऊ शकतो.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक हवामान संस्था’ ने गठित केलेल्या १६ सदस्यांच्या टीमने असे म्हटले की, श्वसनाचे आजार किंवा त्याचे संक्रमण बऱ्याचदा हंगामी आजाराप्रमाणे असते त्यामुळेच हवामान आणि तापमानानुसार कोरोना व्हायरसचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. शास्त्रज्ञांच्या टीम असेही सांगितले की, आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संसर्गावर नियंत्रण राखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र ते प्रयत्न काही प्रमाणात अपयशी असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रभाव वाढताच राहण्याची शक्यता निर्माण होईल आणि कोरोना व्हायरस हा हंगामी आजारात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही.

WHO ने देखील दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या मते, गेल्या आठवड्यात जगातील कोरोनाबाधितांमध्ये १० टक्के दराने वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये युनायटेड स्टेट्स आणि युरोपचे प्रमाण सर्वाधिक आहे. डब्ल्यूएचओने बुधवारी जाहीर केलेल्या कोरोना व्हायरससंदर्भातील साप्ताहिक आकडेवारीनुसार, जानेवारीच्या सुरूवातीच्या काळात देशभरात कोरोनाने कहर केला होता. आता आठवड्यात साधारण ५० लाख बाधितांची नोंद करण्यात येत होती. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात बाधितांची संख्या घटली असून सध्या ती संख्या २५ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -