घरमुंबईसायन - पनवेल महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात

सायन – पनवेल महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात

Subscribe

सायन - पनवेल महामार्गावर आज तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात चार जण जखमी झाले आहे.

नवी मुंबई येथील सायन पनवेल महामार्गावर आज तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. सायन पनवेल महामार्गावरील सानपाडा येथे तीन वाहनांची एकमेकाला धडक लागून हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चार प्रवाशी जखमी झाले असून त्यांना रवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

चार प्रवासी जखमी

सायन पनवेल महामार्गावर रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला इको व्हॅन ओव्हरटेक करत असताना पाठून भरधाव आलेल्या लक्झरी बसने जोरदार धडक दिली. या धडकेत इको व्हॅन मधील चार जण जखमी झाले आहेत. ही इको व्हॅन पुणे येथून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नवरा नवरी मांडवातून निघाले आणि……


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -