घरमुंबईटाटा हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरची नैराश्यातून आत्महत्या

टाटा हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरची नैराश्यातून आत्महत्या

Subscribe

परळ येथील टाटा हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. डॉ. रुपाली कळकुंदरे (३१) असे या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे नाव असून तिने शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आत्महत्या केली. रुपालीने ड्युटीवर असताना इंजेक्शनेद्वारे गुंगीच्या औषधांचा ओव्हरडोस घेत आयुष्य संपवले. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

टाटामध्ये आल्यापासून होती नैराश्यात

- Advertisement -

मूळची सोलापूरची असणारी रुपाली ही गेल्या दोन वर्षांपासून टाटा हॉस्पिटलच्या भूलतज्ज्ञ विभागात कार्यरत होती. तिचा पती देखील याच हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तीन वर्षांपूर्वी रुपालीचे लग्न झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून नैराश्येत असल्याने तिच्यावर उपचार सुरु होते. याच नैराश्यातून टाटा हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरील स्टाफ क्वार्टसमध्ये तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तिचा पती घरी आला असताना ही घटना समोर आली.

‘त्या ‘दिवशी नेमके काय घडले

- Advertisement -

रुपालीचे पती शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास निवासस्थानी आले होते. प्रथम त्यांनी बंद रुमचा दरवाजा ठोठावला. कोणताही प्रतिसाद न आल्याने अखेर दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. तिथे त्यांना रुपाली बेशुद्घावस्थेत आढळली. यानंतर तिला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा

रुपालीच्या नैराश्याचे नेमके कारण अद्याप समजले नाही. मात्र मानसिक ताण-तणावाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. तिचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. त्यापुर्वी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समजेल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -