घरमुंबईमेट्रोच्या बांधकामाचा पश्चिम रेल्वेच्या १२० वर्ष जुन्या इमारतीला धोका?

मेट्रोच्या बांधकामाचा पश्चिम रेल्वेच्या १२० वर्ष जुन्या इमारतीला धोका?

Subscribe

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या धक्क्यांचा आजूबाजूच्या बांधकामांना धोका पोहोचणार नसल्याची खात्री दिली आहे. पण तरीही पश्चिम रेल्वेने इमारतीचं सखोल स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील ओव्हल मैदानात सुरु असलेल्या मेट्रोच्या बांधकामाचा येथील पश्चिम रेल्वेच्या १२० वर्ष जुन्या दुमजली इमारतीला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून ओव्हल मैदानातील मेट्रोच्या कामात भूमिगत स्फोट होत आहेत. या स्फोटांमुळे जवळच असलेल्या पश्चिम रेल्वेच्या दुमजली इमारतीला हादरे बसत आहेत. या स्फोटांमुळे भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्याचे अनुभव येत असून इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या धक्क्यांचा आजूबाजूच्या बांधकामांना धोका पोहोचणार नसल्याची खात्री दिली आहे. पण तरीही पश्चिम रेल्वेने इमारतीचं सखोल स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.

पश्चिम रेल्वेच्या मॅजेस्टिक ग्रेड I हेरिटेज इमारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “मागील काही आठवड्यांपासून त्यांना हादरे जाणवू लागले. दररोज सात ते आठ हादरे बसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे दुपारच्या जेवणानंतर हे हादरे बसत आहेत. या हादऱ्यांमुळे दुमजली इमारतीच्या खिडक्या खिळखिळ्या झाल्या आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – आरे वृक्षतोड प्रकरण : एक झाड तोडण्यासाठी १३ हजार रुपये?

दरम्यान मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो लाईन ३ च्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकतेच याबाबत आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले की, मेट्रोच्या भूमिगत कामांमध्ये होणाऱ्या स्फोटांमुळे आजूबाजूच्या बांधकामांना कोणतीही हानी पोहोचत नसल्याची शाश्वती देतानाच अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेला कोणताही धोका पत्करायचा नसल्याने त्यांनी अभियंता विभागाकडे इमारतीच्या सखोल स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे. त्यानुसार ज्येष्ठ अभियंत्याच्या म्हणण्यानुसार इमारतीचे बीम आणि इतर महत्त्वाच्या भागांना कोणताही धोका पोहोचला नाही ना? म्हणून पाहणी करण्यात आली.

पश्चिम रेल्वेच्या इमारतीला कोणताही धोका पोहोचणार नाही ना याबाबत ज्येष्ठ अधिकारी काळजी करत आहेत. आपल्या ऐतिहासिक वारसा बाबत पश्चिम रेल्वे खूपच सजग आहे. दरम्यान एमएमआरसीकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची शाश्वती मिळाली असली तरी आम्ही आमच्या बाजूनेसुद्धा काळजी घेत आहोत.
रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -