Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई दगडी चाळीच्या 'डॕडी'चा पदवी परीक्षेचा लागला निकाल

दगडी चाळीच्या ‘डॕडी’चा पदवी परीक्षेचा लागला निकाल

Related Story

- Advertisement -

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय. मात्र कारगृहात शिक्षा भोगत असतानात त्याने आता पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. कारावासात असताना वेळेचा सदुपयोग करत त्याने बी. ए. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) प्रवेश घेतला. तसेच या वर्षाची अंतिम वर्षाची त्याने परीक्षाही दिली. नुकताच अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. यातील डॉडीचा निकाला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. याचदरम्यान त्याने २०१८ मध्ये इग्नूत प्रवेश घेतला. याबाबत इग्नुचे विभाग केंद्र संचालक डॉ.पी. शिवस्वरुप सांगतात , इग्नुचे सर्व अभ्यासक्रम हे विद्यार्थीमुख पद्धतीचे आहेत. त्यामुळे तीन वर्षाचा बी.ए. अभ्यासक्रम सहा वर्षांपर्यंत पूर्ण करण्याची संधी दिली जाते. यात गवळीनेही काही महिन्यांपूर्वी अंतिम वर्षाची परीक्षा दिली. या परीक्षेतील पाच पैकी तीन विषयांत तो पास होऊ शकला. मात्र आमच्या दृष्टीने त्याचे पास होणे महत्त्वाचे नसून शिक्षा भोगत असतानाही त्याने अभ्यासाकडे मन वळवत परिवर्तनाचा मार्ग स्वीकाराला हे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

यापूर्वी २०१८ मध्ये गवळीने गांधी विचार मंच च्या परीक्षेत टॉप केले होते. त्यावेळी ८० पैकी ७४ मार्क मिळवले होते. त्यानंतर त्याने आता बी.एपर्यंतचे पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -