घरमुंबईछोटा राजनच्या भावाला रिपाइंची उमेदवारी!

छोटा राजनच्या भावाला रिपाइंची उमेदवारी!

Subscribe

रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन सहा पैकी चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये दीपक निकाळजे यांचाही समावेश आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शिवसेना-भाजप युतीनेसुद्धा पक्षानुसार उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली. शिवसेना-भाजपा महायुतीचा घटक असलेल्या रिपब्लिकन पक्षाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी सहा जागा देण्यात आल्या आहेत. पैकी एका जागेवर रिपाइंनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यालाही उमेदवारी दिली आहे. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन सहा पैकी चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये दीपक निकाळजे यांचाही समावेश आहे.

भाजपा गुंडांना निवडणुकीत उतरवतेय – नवाब मलिक

दीपक निकाळजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “भाजपा आता गुंडांना निवडणुकीत उतरवत आहे. याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून माफिया पुरुषोत्तम सोलंकी यांना निवडणुकीत उतरवलं होतं आणि आपल्या सरकारमध्ये मंत्री केलं होतं.”

- Advertisement -

असे आहे युतीचे जागावाटप

शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात मित्रपक्षांना १४ जागा सोडण्यात आल्या असून रामदास आठवलेंच्या रिपाइला ६, सदाभाऊ खोत यांच्या रयतक्रांतीला ३, विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला ३ तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला २ जागा भाजपने दिल्या आहेत. त्यामुळे भाजप १५१ तर मित्रपक्ष १४ अशा १६४ जागांचा वाटप बुधवारी करण्यात आले. महायुतीतील शिवसेना १२४ जागांवर लढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -