अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक रियाझ भाटीला अंधेरीतून अटक

underworld don dawood ibrahim close aide riyaz bhati arrested by mumbai police

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्त गँगस्टर रियाझ भाटी याल मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी विभागाने अंधेरीतून अटक केली आहे. भाटीविरोधात खंडणी व जीवे मारण्याच्या धमक्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. भाटी बऱ्यात दिवसांपासून फरार होता. अखेर अंधेरीतील वर्सोवा पोलिसांना त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटी यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत महागडी वाहनं आणि 7 लाखांहून अधिकचे खंडणी उकळली होती. या संदर्भात व्यावसायिकाने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. भाटी हा अंधेरी परिसरात एका ठिकाणी येत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याचेही नाव एफआयआरमध्ये आहे. गुप्त माहितीनंतर गुन्हे शाखेच्या एईसी पथकाने सापळा रचून आरोपीला अंधेरी परिसरातून अटक केली. मुंबईतील गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात भाटी हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह आरोपी आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर भाटी यांनी यापूर्वी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यावेळी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला होता. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

रियाझ भाटी हा कुख्यात गँगस्टर आहे, ज्याचा दाऊद इब्राहिम टोळीशी थेट संबंध असल्याचे मानले जाते. भाटी यांच्यावर खंडणी, जमीन हडप, फसवणूक, बनावट कागदपत्रे, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्टद्वारे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक करण्यात आली आहे. रियाझ भाटी हा गेल्या वर्षी जुलैमध्ये गोरेगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचा सहआरोपी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी हा वाझेच्या सांगण्यावरून बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळायचा. या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रद्द केला होता, तेव्हापासून तो फरार होता.


PFI च्या 8 राज्यांतील 25 ठिकाणी पुन्हा छापेमारी; औरंगाबाद सोलापूरमधून काही संशयित ताब्यात