अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच, भाच्याने ईडीसमोर दिली कबुली

दाऊत पाकिस्तानात राहत असल्याचा दावा अनेकवेळा भारताने केला आहे. त्याचे पुरावेही भारताने पाकिस्तानला दिले आहेत. मात्र, आतापर्यंत पाकिस्ताने भारताचा हा दावा फेटाळून लावला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim ) हा पाकिस्तानमध्येच ( Pakistan) राहत असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने (Alishah Parkar) यांने ईडीसमोर ही कबुली दिली आहे. आपला माामा दाऊद हा पाकिस्तानमध्ये कराचीत (Karachi) राहत असल्याचे अलीशाह पारकरने ईडीला (ED) सांगितले.  मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीने अलीशाहची चौकशी केली. यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला.

चौकशीत अलीशाह पारकरने ईडीला सांगितले की,  दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराचीत आहे. मात्र, माझा दाऊदसोबत कोणताही संपर्क नाही. मात्र, सणांच्या काळात दाऊदची बायको महजबीनने माझ्या बायकोशी आणि बहिणीशी संपर्क केला होता. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केले आहे.

दाऊत पाकिस्तानात राहत असल्याचा दावा अनेकवेळा भारताने केला आहे. त्याचे पुरावेही भारताने पाकिस्तानला दिले आहेत. मात्र, आतापर्यंत पाकिस्ताने भारताचा हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र, आता खुद्द दाऊदच्या भाच्यानेच दाऊत कराचीत राहत असल्याची कबुली दिली आहे.