घरमुंबईकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईतील गणेशोत्सवावर मराठीत ट्वीट, म्हणाले...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईतील गणेशोत्सवावर मराठीत ट्वीट, म्हणाले…

Subscribe

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचे आणि नंतर भाजप अध्यक्ष अशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सर्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले. अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत त्यांनी मराठीत एक ट्विट केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावर थाबले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. स्पेशल ब्रांचचे अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, सोबतच काही अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. मात्र, लालबागला जाण्याआधी अमित शाह यांनी मराठीतून एक ट्विट केले होते.

- Advertisement -

ट्विटमध्ये काय –

गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते.

- Advertisement -

असा असेल पुढचा दौरा –

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कोअर कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे ते दर्शन घेणार असून त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -