मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू असलेल्या गदारोळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आज मुंबई दौरा करताना दिसत आहेत. अमित शाहा मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्याआधी त्यांनी मुंबईतील गणेश मंडळांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत. अमित शाहा यांनी आशीष शेलार यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले असून ते आता लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित झाले आहेत. (Union Home Minister Amit shah visit to Mumbai amid ongoing uproar over disqualification of MLAs Darshan of the King of Lalabha)
हेही वाचा – Explainer : मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्रतेवर सोमवारी सुनावणी; शिंदेंनंतर भाजपसमोर पर्याय काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे शहरातील गणपतीच्या मंडळांना भेट देऊन वर्षा निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी महाआघाडी सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांच्या नेत्यांशी आणि अन्य मुद्द्यांवरही चर्चा करू शकतात, अशी अपेक्षा आहे. राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असतानाच अमित शाहा मुंबईत दौरा करत आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून कोणताही प्रतिकूल निर्णय आल्यास भाजपा प्लॅन-बी लागू करू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत भाजपाला निवडणुकीसाठी रणनीती आखून पुढे जायचे आहे. त्यामुळे अमित शाहाचा दौरा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला आहे.
भाजपावर निवडणूका जिंकण्याचा दबाव
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात शिवसेनेसोबत युती केली होती आणि नेत्रदीपक कामगिरी करत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. यूपीएला चार जागा मिळाल्या होत्या. एक-एक जागा AIMIM आणि वंचित बहुजन आघाडीने जिंकली होती, तर एक जागा अपक्षांनी जिंकली होती. अमरावतीमधून विजयी झालेल्या नवनीत राणा यांनी नंतर एनडीएला पाठिंबा दिला. यानंतर एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या 42 वर पोहोचली. राज्यात त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपावर दबाव असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा – दादरमध्ये 15 मजली इमारतीला भीषण आग; 60 वर्षीय व्यक्तीचा गुदमरुन मृत्यू
अमित शाहा मुंबई विद्यापीठातील कार्यक्रमाला लावणार हजेरी
दरम्यान, अमित शहा आज मुंबई विद्यापीठात लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे. लक्ष्मणराव इनामदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते होते आणि ‘सहकार भारती’च्या सहकार्याने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘सहकार भारती’ ही एक सहकारी संस्था आहे, ज्याची स्थापना इनामदार यांनी केली होती.