घरCORONA UPDATEपालिकेच्या बायोमेट्रीक हजेरीच्या निर्णयाचा संघटनांकडून निषेध!

पालिकेच्या बायोमेट्रीक हजेरीच्या निर्णयाचा संघटनांकडून निषेध!

Subscribe

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीबरोबरच बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्याच्या निर्णयावरून आता कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. एका बाजुला राज्य सरकारमध्ये अजुनही १० टक्के हजेरीची सक्ती असून महापालिका १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करताना बायोमेट्रीक हजेरीची का सक्ती केली जात असा सवाल करत कामगार संघटनांनी पावसाळ्यापर्यंत या प्रणालीचा वापर केला जावू नये अशी मागणी केली आहे.

कोरेानाचा प्रार्दुभाव झाल्यापासून याच्या उपाययोजनांसाठी महापालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहे. यासर्व कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद असून आतापर्यंत हे काम करत असताना महापालिकेचे ९०हून  अधिक कर्मचारी शहिद झाले आहेत. त्यामुळे एकप्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि काळजीचे वातावरण असतानाच सामान्य प्रशासनाच्यावतीने १०० टक्के उपस्थितीसह बायोमेट्रीक प्रणालीद्वारे हजेरी येत्या सोमवारपासून बंधनकारक केल्याबाबतचे परिपत्रक बुधवारी जारी करण्यात आल्याने याचा तीव्र निषेध बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष व सरचिटणीस यशवंत धुरी यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करत सध्याच्या परिस्थितीचा आणि पावसाळ्याचा विचार ककरून बायोमेट्रीक हजेरीचा निर्णय पावसाळ्यापर्यंत पुढे ढकलावा,अशी मागणी मागणी केली आहे.

- Advertisement -

१५ जूनपासून रेल्वे सेवा अंशत: सुरु झाली असून लोकल गाड्या सर्वच स्थानकांवर थांबत नाही. त्यामुळे मधल्या स्थानकांच्या परिसरांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बस, रिक्षा व अन्य वाहनांने जंक्शनच्या स्थानकांवर यावे लागते. तसेच बस सेवाही पूर्णपणे सुरळीत सुरु नाही. त्यामुळे बायोमेट्रीक सुरु केल्यास कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित होण्यास शक्य होणार नाही. सध्या कर्मचाऱ्यांच्या दोन तास कामावर यायला आणि दोन तास घरी पोहोचायल लागतात. त्याशिवाय प्रवास खर्चाचा अतिरिक्त आर्थिक भूर्दंड कर्मचाऱ्यांच्या सोसावा लागत आहे.त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार येथे बायोमेट्रीक हजेरी बंद असून ती त्यांनी अद्याप चालू केलेली नाही. तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ५ टक्के तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थितीच्या परिपत्रकात अजुनही बदल केलेला नाही. मात्र, महापालिकेला १०० टक्के उपस्थितीची सक्ती का केली जाते,असाही सवाल इंजिनिअर्स युनियनने केला आहे.

दि म्युनिसिपल युनियननेही याबाबत  निषेध व्यक्त करत याविरेाधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी स्पष्ट केले. बायोमेट्रीक हजेरी आणि १०० टक्के उपस्थितीबाबत परिपत्रक जाहरी करून प्रशासनाने कामगार,कर्मचाऱ्यांना कामचुकार ठरवून अवसान घातकी निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Video : Tiktok बंद झाल्याचे समजताच शाहरूख – काजोल ढसाढसा रडले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -