घरमुंबईलवकरच विमानतळ होणार पेपर लेस

लवकरच विमानतळ होणार पेपर लेस

Subscribe

देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान बोर्डिंग प्रक्रियेसाठी लकरच युनिक ओळख क्रमांक (युआयडी) देण्यात येणार आहे. देशांतील चार मेट्रो विमानतळांवर लवकरच ही सुविधा सुरु होणार आहे. “डीजी यात्रा” अंतर्गत बायोमॅट्रिक पद्धतीने हा युआयडी तयार करण्यात येणार आहे. या सुविधे अंतर्गत प्रत्येक प्रवाशाला विमान वाहतूक मंत्रालयाच्या संकेतस्थळावरुन युनिक आयडी मिळणार आहे. हा आयडी नंबर तिकीट काढते वेळी प्रवाशाला विमानतळावर देणे गरजे राहील.
या प्रक्रियेमुळे प्रवासा दरम्यान बोर्डिंग प्रक्रियाही पेपरलेस होणार आहे. याव्यतिरीक्त अन्य प्रक्रिया सारख्या रहाणार आहे. विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासाठी सप्टेंबर २०१६ पासून एअर सेवा नावाचे पोर्टल सुरु केले होते. आता या पोर्टलचा वापर डिजी यात्रा नावाने केला जात आहे.
या बाबत माहिती देतांना एएआयचे अध्यक्ष गुरुप्रसाद महापात्रा यांनी सांगितले की, ” एअरसेवेचे अपडेटेड व्हरजन आम्ही लवकरच लाँच करणार आहोत.एअरसेवा-II सेवा लकरवच डिजी-यात्रा पोर्टलशी लिंक करण्यात येणार आहे. युनिक आयडी मिळाल्यानंतर प्रत्येक प्रवाशाला डिजी-यात्रा बरोबर लिंक करण्यात येणार आहे. या पोर्टलवर नोंदणी करून प्रवाशांना स्वत:बद्दलची सगळी माहिती भरावी लागेल. युनिक आयडी मिळवण्यासाठी प्रवाशांना त्यांचे आधारकार्ड किंवा लायसन्स या कागदाची पुर्तता करावी लागेल.”
विमानप्रवास करणाऱ्यांना विमानात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षेच्या अनेक चाचण्या पार पाडाव्या लागतात. अनेक कागदपत्रं सोबत बाळगावी लागतात. कागदपत्रांच्या छाननीसाठी कधी-कधी तास-तास रांगेत उभं राहावं लागतं. हे सारं टाळण्यासाठी आता एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियानं पावलं उचलली आहेत. एकदा प्रवाशांची बायोमॅट्रीक माहिती गोळा केल्यानंतर ती सिस्टममध्येच जतन केली जाणार आहे. या माहितीमुळे प्रवाशांसाठी इ-गेट खुले होणार आहे. त्यानंतर विमानतळावर चेक इन, चेक आऊट, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग क्यू आर कोड या सर्व प्रोसजर पेपर लेस होणार आहेत. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -