घरताज्या घडामोडीबुद्धीमत्ता व लैंगिकता यांचा संबंध नाही हे संघाच्या लोकांना समजणार नाही -...

बुद्धीमत्ता व लैंगिकता यांचा संबंध नाही हे संघाच्या लोकांना समजणार नाही – सचिन सावंत

Subscribe

स्वतंत्र बुद्धी ही संघ विचारधारेसाठी घातक

मंगळवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्र विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. ‘समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही विद्यापीठावर सदस्य म्हणून नियुक्त करणारा का?’, असा सवाल त्यांनी केला. मुनगंटीवार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. ‘बुद्धीमत्ता व लैंगिकता यांचा संबंध नाही हे देशाला बुरसटलेल्या विचारांच्या अंध:कारात घेऊन जाऊ पाहणाऱ्या संघाच्या लोकांना समजणार नाही टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. स्वतंत्र बुद्धी ही संघ विचारधारेसाठी घातक’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘जगात प्रचंड सकारात्मक व प्रगतीशील बदल घडवणारे अनेक लोक वैज्ञानिक, विचारवंत, चित्रकार हे समलैंगिक होते’, असेही पुढे सचिन सावंत यांनी म्हटले.

 

- Advertisement -

‘समलैंगिक , अलैंगिक आणि आंतरलिंगी संबंध ठेवणारा आहे हे कोण सिद्ध करणार? अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा व्यक्ती. आता या व्यक्तीने माझ्याशी अलैगिंक संबंध ठेवले आहेत असे सर्टिफिकेट जनावरे देणार आहेत का?’ असे वादग्रस्त वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी अधिवनेशाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात केले.

- Advertisement -

पुढे मुनगंटीवार म्हणाले, टमला समलैंगिक संंबंध ठेवण्याचे आकर्षण आहे असे कोणतीही व्यक्ती लिहून देणार आहे का? हे कोण सिद्ध करणार सचिव? मंत्री? राज्यमंत्री? कोण सिद्ध करणार?ट असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसेच ‘समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य करणार असाल तर काहीतरी गांभीर्य ठेवा’, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले.

 


हेही वाचा – समलैंगिक, अलैंगिक संबंध कोण सिद्ध करणार?, जनावरं येऊन सांगणार काय?; मुनगंटीवारांचा पारा चढला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -