घरमुंबईकेरळ पूरग्रस्तांसाठी विद्यापीठाची मदत

केरळ पूरग्रस्तांसाठी विद्यापीठाची मदत

Subscribe

केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यभरातील विद्यापीठांना केले होते. राज्यपालांच्या या आवाहनाला मुंबई विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यभरातील विद्यापीठांना केले होते. राज्यपालांच्या या आवाहनाला मुंबई विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी केलेल्या आवाहनानंतर विद्यापीठातील विभागप्रमुखांनी केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचा पगार देण्याचे जाहीर केले.

कॉलेज प्राचार्यदेखील या उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या टप्यात ६ लाख विद्यार्थी व ७९१ महाविद्यालयांना जलद संवादाचे माध्यम म्हणून विद्यापीठाच्या मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन डॉ. सुहास पेडणेकर यांच्याहस्ते करण्यात आले. या अ‍ॅपच्या संदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी विद्यापीठात प्राचार्यांची विशेष बैठक बोलविली होती. त्यावेळी त्यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. तेव्हा विभागप्रमुखांनी एक दिवसाचा पगार देण्याचे मान्य केले.  या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. तर विद्यापीठामधील विद्यानगरी कॅम्पसमध्ये लवकरच ‘इनक्युबेशन केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयांनीही संशोधनासाठी  इनक्युबेशन केंद्र’ स्थापन करावे, असे आवाहन डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले.

- Advertisement -

मोबाईल अ‍ॅपची सुविधा

सदर मोबाईल अ‍ॅप अँड्रॉइड वापरणार्‍यासाठी असेल व प्लेस्टोअरमधून हे अ‍ॅप Mum e-Suvidha या नावाने डाऊनलोड करता येईल. विद्यार्थांना विद्यापीठाने दिलेला पीआरएन हा १६ अंकी क्रमांक त्याचा युजर आयडी असेल व पासवर्ड कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेला आहे. जर पासवर्ड विसरला असेल तर विद्यापीठाच्या डिजीटल युनिवर्सिटीच्या संकेतस्थळावरून फरगॉट पासवर्डच्या माध्यमातून त्याला पासवर्ड मिळविता येईल.
या मोबाईल अ‍ॅपमधून कॉलेज व विद्यार्थ्यास प्रवेश व परीक्षासंदर्भात विविध सुविधा उपलब्ध होतील. विद्यार्थ्यास परीक्षेच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट अशा सुविधा मिळतील तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यास विविध सूचना या अ‍ॅपमार्फत पाठवू शकतो. विद्यापीठ महाविद्यालयास या अ‍ॅपमार्फत विविध सूचना पाठवू शकतो. तसेच महाविद्यालयास या अ‍ॅपमधून प्रवेश व परीक्षा संबंधाची सर्व माहिती मिळते. यामुळे कॉलेज व विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या विविध सूचना तात्काळ प्राप्त होतील. या बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे उपस्थित होते. तसेच डॉ. उदय साळुंखे, सुचित्रा सुर्वे, स्वाती साळुंखे व राजेश यांनी याप्रसंगी प्राचार्यांना मार्गदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -