Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Unlock : मुंबई तिसऱ्या गटात, BMC दिवसभरात नियमावली जाहीर करणार- महापौर

Unlock : मुंबई तिसऱ्या गटात, BMC दिवसभरात नियमावली जाहीर करणार- महापौर

मुंबईत अनलॉक प्रक्रियेत काय सुरु राहणार काय बंद राहणार याबाबत नवीन परिपत्रक जारी करण्यात येईल

Related Story

- Advertisement -

राज्यात ७ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. ही अनलॉक प्रक्रिया पाच टप्प्यात केली जाणार आहे. मुंबई ही तिसऱ्या गटात असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. (Mumbai in the third group in Unlock Process) मुंबईतील बेड्स सध्या ३५ टक्क्यांनी भरलेले आहेत. मुंबईत मागील दोन आठवड्यांचा सरारसरी पॉझिटिव्हिटि रेट हा ५.३० टक्के इतका आहे. मुंबईत ऑक्सिजन बेडचा वापर हा ३२ ते ३४ टक्के इतका आहे. मुंबईत अनलॉक प्रक्रियेची नवीन नियमावली मुंबई महानगरपालिका आज दिवसभरात जाहीर करणार आहे. मुंबईत अनलॉक प्रक्रियेत काय सुरु राहणार काय बंद राहणार याबाबत नवीन परिपत्रक जारी करण्यात येईल,असे महापौरांनी म्हटले आहे. (Unlock: Mumbai in the third group, BMC will announce the rules throughout the day – Mayor kishori Pednekar)

महापालिकेचे परिपत्रक केंद्र,राज्याच्या गाईडलाईन आणि मुंबईची सध्याची परिस्थिती पाहून विचार करुन महापालिका  जारी करणार आहे.  मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याचे नमूद करण्यात आले होते याबाबत महापौरांनी स्पष्टीकरण दिले, मुंबई दुसऱ्या टप्प्यात गेली तर मुंबईत ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्के भरलेले असणे गरजेचे आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत मुंबईत ४० टक्क्यांहून अधिक बेड भरलेले आहेत. सद्य खरी परिस्थिती काय आहे व आपण कोणत्या टप्प्यात आहोत त्याचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येत आहेत,असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबई नक्कीच पहिल्या टप्प्यात येईल

- Advertisement -

मुंबई लवकरच पहिल्या टप्प्यात पोहचेल. त्यासाठी सर्व स्थरातील लोकांचे सहकार्य असल्यास मुंबई निश्चितच पहिल्या टप्प्यात पोहचेल. सध्या मुंबईची लोकसंख्या पाहता पहिल्या टप्प्यात येण्यासाठी आणखी वेळ लागेल पण मुंबई नक्कीच पहिल्या टप्प्यात येईल,असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

लसीचे ग्लोबल टेंडर अपात्र ठरले

लसीचे ग्लोबल टेंडर अपात्र ठरले आहे. लसींसाठी टाकलेल्या अटींत उत्पादक जास्त येतील अशी अपेक्षा होता होती मात्र उत्पादकांपेक्षा पुरवठादार जास्त आले. पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी केली असता ते अपात्र ठरले.रेड्डीज लॅबोरेटरीजकडून मुंबईला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता त्यांच्याकडून जुलै ऑगस्ट पर्यंत सर्व लसी आपल्याला मिळतील असा संवाद त्यांच्यासोबत सुरु आहे.

विरोधकांना टोला

- Advertisement -

विरोधी पक्षांनी शब्दांचा झिम्मा खेळला. आम्हाला नौटंकी करण्यापेक्षा सकारात्मक होऊन लोकांना कसे वाचावायचे ही पाहणे महत्त्वाचे आहे. मुंबईचे जागतिक स्थरावर कौतुक झाल्यानंतर विरोधकांच्या जिव्हारी लागले आहे. शब्द प्रयोग करुन हिनवणे हे त्यांची भूमिकाच आहे,असा टोला महापौरांनी विरोधकांना लगावला. विरोधकांना प्रतिक्रिया देण्यापेक्षा आम्हाला काय करायचे आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे,असे महापौरांनी म्हटले.


हेही वाचा – Maharashtra Unlock: ७ जूनपासून राज्यात पाच टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार, पहा नवीन नियमावली

- Advertisement -