HomeमनोरंजनUrmila Kothare : अचानक वळण आलं अन्...; भीषण अपघातानंतर ठणठणीत बऱ्या झालेल्या...

Urmila Kothare : अचानक वळण आलं अन्…; भीषण अपघातानंतर ठणठणीत बऱ्या झालेल्या उर्मिलाने सांगितला घटनाक्रम

Subscribe

लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे हिचा 28 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. जवळपास 15 दिवसांनी उर्मिला कोठारे ठणठणीत बरी होऊन घरी परतली आहे. यानंतर तिने आता सोशल मीडियावर पोस्ट टाकत अपघाताचा घटनाक्रम सांगितला आहे.

मुंबई :  लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे हिचा 28 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. कांदिवली परिसरात झालेल्या या भीषण अपघातात उर्मिला कोठारे आणि तिच्या कारचा चालक गंभीर जखमी झाला होता. जवळपास 15 दिवसांनी उर्मिला कोठारे ठणठणीत बरी होऊन घरी परतली आहे. यानंतर तिने आता सोशल मीडियावर पोस्ट टाकत अपघाताचा घटनाक्रम सांगितला आहे. (Urmila Kothare who recovered well after a terrible accident narrated the incident)

उर्मिला कोठारे हिने तिची मुलगी आणि वडिलांसोबत एका फोटो पोस्ट करत अपघात कसा घडला? याची माहिती दिली आहे. तिने म्हटले की, 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 12.45 च्या सुमारास माझा एक गंभीर कार अपघात झाला. रात्री पोईसर मेट्रो स्टेशनजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोचे काम सुरू होते. मोठी यंत्रसामग्री आणि जेसीबी लोडर/एक्सकॅव्हेटर त्याठिकाणी उभी होती. माझा चालक कार चालवत होता आणि अचानक वळण आले, त्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. अचानक झालेल्या धडकेनंतर मी आणि माझा चालक गंभीर जखमी झालो व बेशुद्ध पडलो. सुदैवाने, आम्हाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मुंबई पोलिस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे आभार मानते, ज्यांनी तत्काळ कारवाई केली आणि आम्हाला रुग्णालयात हलवले, असे उर्मिलाने म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Amruta Khanvilkar : अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश

- Advertisement -

उर्मिला कोठारे म्हणाली की, मी आता घरी आले आहे. मला अजूनही पाठीला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला किमान 4 आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बाप्पाचे आभार मानते, कारण खूप वाईट होऊ शकले असते. याशिवाय माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार ज्यांनी काळजी केली आणि माझ्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. हा एक गंभीर अपघात होता आणि माझ्या कार चालकाविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल, असा विश्वास उर्मिलाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Sundar Pariwani Song : मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटातील ‘सुंदर परीवानी’ हे गाणं लाँच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -