उर्मिला कंगनावर भडकली म्हणाली, ‘बाईंच्या डोक्यावर अपघात झाला’

रंगीला गर्लने दिलं कंगनाला सडेतोड उत्तर.

Urmila Matondkar's Instagram account hacked
उर्मिलाचे मातोंडकर

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि बॉलिवूड क्विन अभिनेत्री कंगना रानौत यांच्यात शाब्दिक ट्विटर वॉर रंगला होता. त्यांच्यातील वाद मुंबई उच्च न्यायालयातसुद्धा पोहोचला आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांनी कंगना आज पुन्हा एकदा मुंबईत आली आणि तिने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. यावर रंगीला गर्ल हिने तिला ट्विटरवरुन प्रतिउत्तर दिले आहे. ‘बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…’,असा प्रश्न उर्मिया यांनी उपस्थित केला आहे.

नेमके काय झाले?

मुंबईत पोचल्यानंतर कंगनाने सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले. तिच्यासोबत बहिण रंगोली आणि भाऊ-वहिनीसुद्धा उपस्थित होती. त्यावेळी कंगनाने नाव न घेता ठाकरे सरकारला डिवचले आहे.

काय म्हणाली कंगना?

सिद्धिविनायक मंदिराबाहेर येताच ‘जय महाराष्ट्र’, असे कंगनाने म्हटले. त्याठिकाणी असलेल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली की, ‘मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे आणि ती मला मिळाली. त्यामुळे अजून कोणाकडेही परवानगीची गरज नाही. ‘मंदिराबाहेरील फोटो कंगनाने ट्विटरवरुन शेअर केले आहेत. त्यात ती म्हणाली आहे की, ‘माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभं राहिल्यानंतर शत्रुत्वाचं प्रमाण आश्चर्यचकित करणारे होते. आज मी मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुर्क्षित आणि स्वागत केल्यासारखं वाटतं आहे’.


हेही वाचा – मुंबईतील शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय