घरमुंबईमोबाईल चोरीसाठी कोडवर्डचा वापर - कौआ, मशीन, पलटीबाज, छप्परबाज

मोबाईल चोरीसाठी कोडवर्डचा वापर – कौआ, मशीन, पलटीबाज, छप्परबाज

Subscribe

कौआ, मशीन, पलटीबाज, छप्परबाज, ठेकेबाज, मालखाव, असे विचित्र शब्द कानावर पडले की, समजा तुमचा मोबाईल धोक्यात आहे. मोबाईल चोर अशा कोडवर्डचा वापर करून मोबाईल चोरतात.

खचाखच भरलेल्या लोकलमधून तुम्ही प्रवास करत आहात आणि तुमच्या कानावर कौआ, मशीन, पलटीबाज, छप्परबाज, ठेकेबाज, मालखाव, असे विचित्र शब्द कानावर पडले की, समजा तुमचा मोबाईल धोक्यात आहे. मोबाईल चोर अशा कोडवर्डचा वापर करून मोबाईल चोरतात. मुंबईत दररोज दहा ते पंधरा मोबाईल चोरीला जातात. परप्रांतीय मोबाईल चोर टोळ्या मुंबईत कार्यरत असून मुंबईत चोरलेले मोबाईल थेट बिहार, उत्तर प्रदेश, दिल्लीत विकले जातात.
मुंबईतील हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करतात. सकाळी आणि सायंकाळी विशेषत: उपनगरीय लोकलला प्रचंड गर्दी असल्याने अशाच वेळी या मोबाईल चोरी करणार्‍या टोळ्या अधिक सक्रिय असतात. यातील बहुतांश टोळ्या परप्रांतिय असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. चोरीचे मोबाईल बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कोलकाता तसेच आता बांगलादेशात विकले जात आहेत.

मुंबई शहराचा विचार केला तर दररोज गर्दीचा फायदा घेऊन तसेच प्रवाशांचे लक्ष विचलित करून दहा ते पंधराहून अधिक मोबाईल चोरी होतात. त्यापैकी काही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद होते तर काहीजण मोबाईल चोरी झाल्याची तक्रार करत नाहीत. त्यामुळे अशा टोळ्यांचे दिवसेंदिवस फावत चालले आहे. अलीकडेच रेल्वे पोलिसांनी अशाच एका मोबाईल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला होता.सहाजणांच्या या टोळीच्या अटकेनंतर हे मोबाईल चोर,चोरी करताना विशेष कोडवर्डचा वापर करत असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

अशा अनेक कोडवर्डचा वापर करुन ही टोळी मुंबई शहरात मोबाईल चोरीसाठी सक्रिय होती. त्यांच्या अटकेने मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयएमईआय क्रमांक बदलून मोबाईल विकत घेणार्‍या व्यक्तींविरुद्ध आता रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. मात्र, या कोडवर्डचा वापर करून मोबाईल चोरी करणार्‍या टोळीच्या नव्या गुन्ह्यांची पाहता पोलिसांना धक्का बसला आहे.

हे आहेत कोडवर्ड

१)कौआ म्हणजे ज्या व्यक्तीचा मोबाईल चोरायचा आहे ती व्यक्ती.
२) मशीन म्हणजे चोरी करणारा आरोपी टोळीतील सदस्य .
३) ठेकेबाज म्हणजे जो इतर प्रवाशांचे लक्ष विचलित करुन मोबाईल चोरीसाठी मदत करतो.
४) छप्परबाज हा गर्दीत मिसळून टार्गेटला नकोसा स्पर्श करुन विचलित करतो. त्याच्याशी वाद घालतो.
५)मालखाव हा पाचवा कोड असून चोरलेला मोबाईल त्याच्याकडे जमा केला जातो.
६) कलर पलटी चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -