देवेन भारती यांच्या जागी व्ही. के. चौबे यांची नियुक्ती

अखेर मुंबईचे सह पोलीस आयुक्तपदी (कायदा व सुव्यवस्था) विनोद कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vinod_Chaubey
विनोद कुमार चौबे

अखेर मुंबईचे सह पोलीस आयुक्तपदी (कायदा व सुव्यवस्था) विनोद कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांच्या तडकाफडती बदली केल्यानंतर त्यांच्या जागी व्ही. के. चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे व्ही. के. चौबे यांच आताचं सह पोलीस आयुक्तपदाचं खातं (आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई) हे देवेन भारती यांच्या देण्यात आले असून चौबे यांना भारती यांच्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदावर त्वरीत रुजू व्हावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

letter
बदलीचे पत्रक

भारती यांच्या बदलीचे आदेश होते

मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना दिले होते. मुंबई पोलीस दलातील महत्वाचे मानले जाणारे कायदा व सुव्यवस्था हे पद आहे. या पदावर देवेन भारती हे गेल्या चार वर्षांपासून तग धरून बसले होते. निवडणुकीच्या काळात भारती यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. निवडणूक आयोगाने भारती यांच्या बदलीचे आदेश दिले असून लवकरात लवकर यांच्या जागी अधिकारी नेमण्यात यावा, असेही आयोगाने म्हटले होते. त्यानुसार अवघ्या काही तासात व्ही. के. चौबे यांची नियुक्ती (कायदा व सुव्यवस्था) या खात्यावर करण्यात आली आहे. भारती यांच्या जागी (कायदा सुव्यवस्था) सह आयुक्त म्हणून आशुतोष डुंबरे आणि नवल बजाज यांच्या नावाची चर्चा होती.

भारती हे मुंबई पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था यापदावर सहपोलीस आयुक्त म्हणून तब्बल ४ वर्षे होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची गोची करून ठेवली होती. मुंबईत घडणाऱ्या गुन्हयाची माहिती, तसेच गुन्ह्या संदर्भात कुठल्याही प्रकारची मदत गुन्हे शाखेला करू नये, गुन्ह्याची उकल पोलीस ठाणे पातळीवरच करण्यात यावी, असे तोंडी फर्मानच भारती यांनी काढले होते. यामुळे गुन्हे शाखेची पूर्ती गोची झाली होती. भारती यांच्या या फर्मानपुढे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनी कुठलाच आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे गुन्हे शाखेला कुणाकडे तक्रार करावी याची सोय राहिली नव्हती.

त्यानंतर पोलीस दलात घडले अनेक बदल

मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्र संजय बर्वे यांच्याकडे येताच त्यांनी मुंबई पोलीस दलात अनेक बदल घडवून आणले. संपूर्ण मुंबई पोलीस दलाची सूत्र बर्वे यांच्या हाती येताच त्यांनी सर्व प्रथम अनेक वर्षांपासून गुन्हे शाखेची झालेली कुचंबना दूर करून गेल्या चार वर्षात मुंबई पोलीस दलात एक हाती सत्ता गाजवणाऱ्याची बर्वे यांनी गोची करून ठेवली होती. पोलीस आयुक्तानी करून ठेवलेल्या गोचीमुळे देवेन भारती यांना या पदावर राहण्यास सारस्व उरले नव्हते, अशी चर्चा पोलीस दलात सध्या सुरु आहे.