घरमुंबईपालिका हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला नातेवाईकांची मारहाण

पालिका हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला नातेवाईकांची मारहाण

Subscribe

सांताक्रूझच्या व्ही. एन. देसाई पालिका हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी वॉर्डबॉलवर संतापून त्याला मारहाण केल्याचे समजते. हे प्रकरण युनियनकडे गेले असून कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

एकीकडे जे. जे. हॉस्पिटलमधी डॉक्टरांना मारहाण झाल्याचे प्रकरण ताजं असताना आता पालिका हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई या पालिका हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला आज सकाळी रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली आहे. नातेवाईकांना वॉर्डमध्ये सोडलं नसल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं ?

शनिवारी रुग्णाच्या नातेवाईकांनी वॉर्डमध्ये जाण्यासाठीची परवानगी वॉर्डबॉय वाल्मिकीकडे मागितली होती. त्यांनी परब यांना भेटायचे आहे, असे सांगितले. परंतू, वॉर्डबॉयने त्यादिवशी नातेवाईकांना वॉर्डमध्ये जाऊ दिलं नाही. वाल्मिकी म्हणाले, येथे भरपूर परब आहेत. तुम्हाला कोणत्या परबला भेटायचे आहे. त्याला फोन लावा आणि माझं बोलणं त्याच्याशी करून द्या. त्यानंतर आज, सोमवारी सकाळी देखील याच कारणावरुन वॉर्डबॉय आणि नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. नातेवाईकांनी तेथील वरिष्ठ वॉर्डबॉयला वाल्मिकीबाबत सांगितले. त्याला उत्तर देताना वाल्मिकी म्हणाला, मला नेमकं माहिती नाही की हे कोणत्या वाल्मिकीबाबत बोलत आहेत. यावर नातेवाईक संतापले आणि त्यांनी वॉर्डबॉयच्या २ ते ३ वेळा कानशिलात लगावली. आता हे प्रकरण युनियनकडे गेल्यामुळे त्यांनी कामबंद आंदोलन करण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -