घरताज्या घडामोडीअपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र ९ जुलैपर्यंत बंद

अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र ९ जुलैपर्यंत बंद

Subscribe

लस साठा उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात येईल

मुंबईतील लसीकरण मोहिमेला चांगला वेग आला होता. मात्र कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिकेची लसीकरण केंद्र केंद्रांवर उद्या शुक्रवार दिनांक ९ जुलै २०२१ रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (vaccination centers in Mumbai closed till July 9 due to insufficient supply of vaccines)

लशींचा पुरेसा साठा प्राप्त झाल्यानंतर त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईतील नागरिकांना लस उपलब्ध करण्यात येईल. लस साठा उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईतील बहुतेक लसीकरण केंद्र लसींच्या अपुऱ्या साठ्यांमुळे बंद आहेत. लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्यामुळे लसी व घेताच नागरिकांना परत जावे लागले.

- Advertisement -

 


हेही वाचा – Coronavirus : अमेरिकेकडून कोरोनाविरोधी ‘मुंबई मॉडेल’चे कौतुक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -