घरमुंबईमुंबईत आतापर्यंत लसीकरणाचे २२ लाख लाभार्थी

मुंबईत आतापर्यंत लसीकरणाचे २२ लाख लाभार्थी

Subscribe

दिवसभरात लसीकरणाचे ३७,४८९ लाभार्थी, लाभार्थ्यांना कोविशिल्डचे २०,७०,२७४ डोस, कोवॅक्सिनचे १,४३,५९० डोस

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशाने देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून ते आजपर्यंत २२ लाख १३ हजार ८६४ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील सहव्याधी, ४५ वर्षांवरील सर्व नागरिक आदींना कोविशिल्ड लसीचे २० लाख ७० हजार २७४ डोस तर कोवॅक्सिंन लसीचे १ लाख ४३ हजार ५९० डोस, असे एकूण २२ लाख १३ हजार ८६४ डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात मुंबईत कोविशिल्ड लसीचे ३२ हजार ९९१ डोस तर कोवॅक्सिंन लसीचे ४ हजार ४९८ डोस, असे एकूण ३७ हजार ४८९ डोस देण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लसीचे डोस देण्याचे आदेशीत केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे. लसीकरणामुळे कोरोना रुग्णांमध्ये एकप्रकारे प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

मात्र मुंबईत आजही संपूर्णपणे लसीकरण प्रक्रिया राबविण्यात लसीचा तुटवडा हे मोठे संकट म्हणून उभे ठाकले आहे. लसींचा तुटवडा जाणवत असल्याने मुंबईतील लसीकरण मोहिमेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली होती.

लसीची निर्मिती करण्यासाठी आवश्यक कच्चा माल हा अमेरिकेमधून आयात करण्यात येत असतो. लस निर्मिती करणाऱ्या पुणे येथील सिरम कंपनीकडे कच्चा माल अधिक प्रमाणात उपलब्ध नसल्याने आणि भारताने अमेरिकेकडे वारंवार मागणी करून अमेरिकेने भारताला आवश्यक कच्चा माल देण्यास स्पष्ट नकार दिल्याने भारतासमोर लस निर्मिती करण्याबाबत एक आपत्कालीन संकट उभे ठाकले आहे.

- Advertisement -

जर १ मे पूर्वी मुंबईत आवश्यक लसीचा साठा वेळीच उपलब्ध झाला नाही तर १८ वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरण मोहिमेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या पालिकेकडे फक्त ३९ लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जात आहे. लसीकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन पालिकेने आणखीन ५६ ठिकाणी लसीकरण केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबईत ७१ खासगी लसीकरण केंद्रे आहेत. मात्र लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला तरच खासगी लसीकरण केंद्रांवरही लसीकरण मोहीम राबवली जाईल. अन्यथा प्रथम फक्त पालिकेच्या लसीकरण केंद्रातच लसीकरणाल केले जाईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -