मुंबईत सरकारी, पालिका लसीकरण केंद्रांवर १० आणि ११ एप्रिल रोजीही लसीकरण

१०, ११, १२ एप्रिल रोजी खासगी लसीकरण बंद

Near to Home: senior citizens,disabled will get vaccine at vaccination centers near their homes
Near to Home: आता जेष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरानजीकच्या लसीकरण केंद्रांवर मिळणार लस

मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत असतानाच आता केंद्राकडून लसीचा साठा उपल्बध होणार असल्याने सरकारी व मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रात १० व११ एप्रिल रोजी कडक निर्बंध असतानाही लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र खासगी लसीकरण केंद्रे १०, ११ आणि १२ एप्रिल रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत लसीकरण मोहीमअंतर्गत उद्या १० एप्रिल दुपारी १२ ते सायंकाळी ६ आणि रविवार ११ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीत महापालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु ठेवण्यात येणार आहे.

मात्र मुंबईतील खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १०,११ आणि १२ एप्रिल या तीन दिवसांत लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. असे असले तरी, लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयातही लसीकरण पुनश्च सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.

या सर्व केंद्रांवर मिळून महापालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. परंतु कोविड-१९ लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १०,११ आणि १२ एप्रिल या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. महापालिकेला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा मिळणार आहे. अधिक प्रमाणात लससाठा उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

दरम्यान, महापालिका आणि महाराष्ट्र शासन संचालित लसीकरण केंद्रांमध्ये शनिवारी १० एप्रिल रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पहिले सत्र असणारे आहे. ज्या केंद्रांमध्ये नियमित दोन सत्रांचे नियोजन होत असेल अशा लसीकरण केंद्रांत दुसरे सत्र रात्री ८ वाजेपर्यंत कार्यान्वित राहिल. यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसुतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे.