घरमुंबईमुंबईत पुन्हा लसीकरणाला नव्या जोमाने सुरुवात

मुंबईत पुन्हा लसीकरणाला नव्या जोमाने सुरुवात

Subscribe

आठवड्यातून चार दिवसच होणार लसीकरण

मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरण मोठ्या जोमात सुरू झाले होते. मात्र ‘कोविन’ अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणीमुळे ते लसीकरण स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. आता या ‘कोविन अ‍ॅप’ मधील तांत्रिक अडचण दूर झाली असून उद्यापासून पुन्हा लसीकरणाला नव्या जोमाने सुरुवात करण्यात येणार आहे. आता आठवड्यातून फक्त ४ दिवसच लसीकरण होणार आहे. मात्र ते चार दिवस कोणते हे लवकरच कळणार आहे. मात्र सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत लसीकरण होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मुंबईत किमान चार हजार लोकांना लस देण्यात येणार आहे. ‘कोविन अ‍ॅप’ मधून चार हजार लाभार्थ्यांना व्हॅक्सिनेशनसाठी मेसेज पाठवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यापुढे आठवड्यात मंगळवार-बुधवार आणि शुक्रवार-शनिवार असे चार दिवसच लसीकरण होणार असल्याचे समजते आहे.

- Advertisement -

मुंबईसह राज्यात १६ जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी १४ हजार लोकांना लस देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यात अचानक बदल करण्यात येऊन फक्त चार हजार लाभार्थ्यांना लस देण्याचे ठरविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात फक्त १ हजार ९२६ लोकांना लस देण्यात आली.

लसीकरणाबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लसीकरण शुभारंभाच्या कार्यक्रमात किमान २ -३ तास वेळ गेला. परिणामी दुपारी १२ नंतर लसीकरणाला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे,लसीकरणाबाबतचे मेसेज संबंधितांना पाठविण्यास तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला. तरीही वॉर्डमार्फत संबंधितांना मेसेज पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे अपेक्षित लोक घराबाहेर पडले नाहीत. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी नाव नोंदणी करणाऱ्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

यासर्व अडचणीमुळे लसीकरणावर काहीसा परिणाम झाला, अशी कारणे दिली होती. कोविन अ‍ॅपमधील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी १७ आणि १८ जानेवारी रोजी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आता या त्रुटी दूर झाल्यामुळे १९ जानेवारीपासून पुन्हा लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पालिकेच्या, नायर रुग्णालय केईएम रुग्णालय, शीव रुग्णालय, कूपर रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, वांद्रे भाभा रुग्णालय, डॉ. आंबेडकर शताब्दी रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, बीकेसी कोविड सेंटर येथील ४० बूथवर लसीकरण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -