घरCORONA UPDATEVaccination: मुंबईत 'या' लसीकरण केंद्रावर देण्यात येतेय १८ वर्षांवरील नागरिकांना लस

Vaccination: मुंबईत ‘या’ लसीकरण केंद्रावर देण्यात येतेय १८ वर्षांवरील नागरिकांना लस

Subscribe

दुपारी १ ते ६ या वेळेत लसीकरण केले जाणार

आजापासून मुंबई,महाराष्ट्रासह देशात १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक राज्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. मुंबईत १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र लसीचा साठा नसल्याने १५ मे पासून लसीकरणाला सुरुवात करु असे सांगण्यात आले. परंतु मुंबईतील काही मोजक्या लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. आज केवळ नायर, बीकेसी,कूपर, सेव्हन हिल्स आणि राजावाडी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण केले जाणार असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. दुपारी १ ते ६ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे.


१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. शंभर टक्के ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय लस दिली जाणार नाही असे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. त्याचप्रमाणे जे लसीकरण केंद्र निवडले आहे त्याच लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका १८ वर्षांवरील लसीकरण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र मुबलक लसीचा पुरवठा होणे गरजेचे आहे असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले होते. १५ मे पासून १८ वर्षांवरील लसीकरण सुरु होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे तो पर्यंत नागरिकांनी कोविन पोर्टलवर लसीसाठी रजिस्ट्रेशन करावे.त्याचप्रमाणे लस घ्यायला या असा मेसेज येत नाही तोवर लस घेण्यासाठी घराबाहेर पडू नका असे आवाहनही महापौरांनी मुंबईकरांना केले आहे.


हेही वाचा – Vaccination: मुंबई, महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -