घरताज्या घडामोडीऑक्सफर्डच्या लसीची चाचणी BMCच्या 'या' हॉस्पिटलमध्ये ३२० जणांवर होणार!

ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी BMCच्या ‘या’ हॉस्पिटलमध्ये ३२० जणांवर होणार!

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील अनेक देश कोरोनाची लस विकसित करत आहे. दरम्यान ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापिठाने विकसित केलेली कोरोना लसीच्या मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केईएम आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये मानवी चाचण्या होणार आहेत. ऑक्सफर्डच्या लसीचे ३२० जणांना डोस दिले जाणार आहेत. त्यामुळे सध्या मानवी चाचणीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी अनेकांमध्ये मोठा उत्साह आहे.

ऑक्सफर्डच्या या कोरोनाचा लसीच्या मानवी चाचणीत सहभागी होण्याकरिता अनेक जण स्वतःहून केईएम हॉस्पिटलला फोन करत होते. या लसीच्या मानवी चाचणीमध्ये आम्ही सामील होऊ शकतो अशी विचारणा करण्यासाठी केईएम हॉस्पिटलचे फोन सतत वाजत होते. पण केईएम आणि नायरमध्ये होणाऱ्या या मानवी चाचणीला थोडा विलंब होत आहे. कारण या दोन्ही हॉस्पिटलच्या नीतीविषयक समितीने काही चाचणी संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या चाचणी संदर्भात अजून माहिती मागवली आहे.

- Advertisement -

परंतु गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने सोमवारच्या आधी ही माहिती मिळणे अशक्य आहे. पण जेव्हा आवश्यक असलेली माहिती मिळेल तेव्हा समिती त्यावर चर्चा करणार असल्याचे नायर हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले आहे. यासंदर्भात केईम हॉस्पिटलचे डीन डॉ. हेमंत देशमुख म्हणाले की, आम्हाला नीतीविषयक समितीच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच परवानगी मिळेल. या लसीची अजून भारतातील कोणत्याही केंद्रावर चाचणी सुरू झालेली नाही आहे. सगळेजण या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.

माहितीनुसार, सुरुवातीला सर्व स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस दिला जाईल. या लसीचा साईड इफेक्ट एवढचा होईल की एक-दोन दिवस सौम्य ताप येईल. स्वयंसेवकांची निवड सरसकट केली जात आहे. त्याची आधी वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर त्यांची लसीचा डोस देण्यासाठी निवड केली जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Unlock 3 : केंद्राचे राज्यांना आदेश; प्रवासी, माल वाहतुकींवरील बंदीसंबंधी दिल्या सुचना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -